Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंनी हिरवा शेला पांघरल्याचा फोटो असेलेले हिरव्या रंगाचे पोस्टर टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त प्रकाशित केले असल्याचा दावा सोशल मीडियात केला जात आहे. टिपू सुलतानच्या जयंतीचे व्हायरल होत असलेल्या पोस्टर हे संपूर्ण हिरव्या रंगांचे असून यात शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण ते शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या गळ्यातील शेला देखील हिरवा दाखवण्यात आला आहे. यावरुन शिवसेनेवर टीका होत आहे. मराठी माणूस, कट्टर भगवावाद, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणार एका प्रादेशिक पक्षाचा सध्याचा कायाकल्प असा दावा देखील या फोटोमुळे केला जात आहे. तर दुस-या एका पोस्टमध्ये ही नवी शिवसेना आहे, कुठे नेऊन ठेवली बाळासाहेबांची शिवसेना? असा सवाल देखील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना विचारण्यात आला आहे.
आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली. व्हायरल पोस्टरमध्ये मीरा भायंदर येथील युवा शहर संघटक सलमान हाशमी यांचा फोटो व कार्यालया संपर्क क्रमांक आढळून आला . यावर आम्ही संपर्क साधला असता हाशमी यांनी सांगितले की, ‘व्हायरल पोस्टर एडिट केलेले आहे. महाराष्ट्र सरकारला लक्ष्य करण्याच्या धोरणाने या पोस्टरचा रंग बदलला गेला, जेणेकरून हिंदू-मुस्लिम राजकारणाच्या नावाखाली लोकांमध्ये फूट पडेल.
त्यांनी सांगितले की,, मुळ पोस्टरवर शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांच्या गळ्यात भगवा रंगाचा शेला असून तो व्हायरल पोस्टमध्ये एडिट करण्यात आला आहे. मूळ पोस्टर देखील भगवे रंगात बनविण्यात आले होते मात्र ते एडिट करुन हिरव्या रंगातही बदलण्यात आले होते.
याशिवायआम्हाला सलमान हाशमी यांच्या पेसबुक पेजवर एबीपी माझाची बातमी आढळून आली ज्यात भाजपने एका पोस्टरमुळे शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. तर याच बातमीमध्ये युवा सेना संघटक सलमान हाशमी यांनी मूळ भगव्या पोस्टमध्ये भाजपनेच छेडछाड केल्याचा आरो केला आहे.
याशिवा सलमान हाशमी यांनी पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या तक्रारीची प्रत देखील फेसबुकवर शेअर केली आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की, शिवसेनेने टिपू सुलतानच्या जंयतीनिमित्त हिरव्या रंगाचे पोस्टर तयार केले नव्हते तर शिवसेनेच्या सलमान हाशमी या युवा नेत्याने भगव्या रंगातील पोस्टर बनविले होते त्याचा खोडसाळपणे रंग बदलून हिरवा करण्यात आला व ते पोस्टर सोशल मीजियात व्हायरल करण्यात आहे.
Facebook- https://archive.vn/oUzQz
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.