Tuesday, December 24, 2024
Tuesday, December 24, 2024

HomeFact CheckReligionयुएईच्या राजकुमारीचा चेन्नईतील मंदिरात पूजा करण्याचा व्हिडिओ आताचा आहे? भ्रामक दावा व्हायरल

युएईच्या राजकुमारीचा चेन्नईतील मंदिरात पूजा करण्याचा व्हिडिओ आताचा आहे? भ्रामक दावा व्हायरल

याचे फॅक्ट चेक न्यूजचेकर हिंदीने केले असून हा लेख सौरभ पांडे याने लिहिला आहे.

Claim

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत दावा केला जातोय की, नुकतेच व्यावसायिक दौऱ्यासाठी भारतात आलेल्या सौदी अरेबियाच्या राणीने चेन्नईच्या मंदिरात पूजा केली. 

Fact

चेन्नईच्या मंदिरात युएईची राजकुमारीचा पूजा करण्याचा व्हिडिओ आताचा आहे, याची पडताळणी करण्यासाठी आम्ही ‘क्वीन व्हिजिट चेन्नई टेम्पल’ हा कीवर्ड टाकून गुगलवर शोधला. या प्रक्रियेत आम्हांला श्री लक्ष्मी नारायण सुवर्णमंदिर, श्रीपुरमच्या Sripuram TV या अधिकृत यु ट्यूब वाहिनीवर ३ जून २०१९ अपलोड केलेला एक व्हिडिओ मिळाला. 

फोटो साभार : Google Search Result

आम्हांला मिळालेल्या व्हिडिओच्या शीर्षकानुसार, यात दिसणारी महिला संयुक्त अरब अमिरातीची राजकुमारी हेंड अल कासिमी (Sheikha Hend bint Faisal Al Qassemi) आहे. त्यांनी २२ जानेवारी २०१९ रोजी चेन्नईच्या मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली. 

राजकुमारी हेंड अल कासिमी यांनी २० मे २०२० रोजी त्यांच्या अधिकृत खात्यावरून मंदिरात जाण्याची गोष्ट सांगितली होती. (या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता) हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर हेंड अल कासिमी विवादात सापडल्या होत्या. 

फोटो साभार : Twitter@LadyVelvet_HFQ

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, भारतातील चेन्नईच्या मंदिरात युएईची राजकुमारीचा पूजा करण्याचा व्हिडिओ शेअर केला जाणारा भ्रामक आहे. खरंतर हा व्हिडिओ २०१९ चा असून आहे आणि यात दिसणारी महिला सौदी अरेबियाची नसून संयुक्त अरब अमिरातीची (युएई) राजकुमारी आहे. 

Result : Partly False

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular