Thursday, April 18, 2024
Thursday, April 18, 2024

HomeFact CheckFact Check: विंग कमांडर अभिनंदन ने म्हटले की पुलवामा हल्ला हा भाजपचा...

Fact Check: विंग कमांडर अभिनंदन ने म्हटले की पुलवामा हल्ला हा भाजपचा विचारपूर्वक डाव, खोटा संदेश होतोय व्हायरल

Claim
विंग कमांडर अभिनंदन ने म्हटले आहे की, पुलवामा हल्ला ही भाजपची विचारपूर्वक केलेली कृती होती.
Fact
अभिनंदन ने असे विधान केलेले नाही. एक पेपर कटिंग चा चुकीचा अर्थ लावून हा दावा केला जात आहे.

पुलवामा हल्ला ही भाजपची विचारपूर्वक केलेली कृती किंवा डाव होता असे विधान विंग कमांडर अभिनंदन ने केले आहे. असा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फेसबुकवर हा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल होत असून युजर्स एका पेपर कटिंग चा हवाला देत आहेत.

Fact Check: विंग कमांडर अभिनंदन ने म्हटले की पुलवामा हल्ला हा भाजपचा विचारपूर्वक डाव, खोटा संदेश होतोय व्हायरल
Courtesy: Facebook/ Sunder Yadav

व्हाट्सअप वरही हा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check: विंग कमांडर अभिनंदन ने म्हटले की पुलवामा हल्ला हा भाजपचा विचारपूर्वक डाव, खोटा संदेश होतोय व्हायरल

हा दावा मूळ हिंदीत आहे. त्यामधील वाक्ये पुढीलप्रमाणे आहेत. “अभिनंदन का बयान पुलवामा हमला बीजेपी की सोची समझी साजिश थी, और पाकिस्तान पर नकली हमला करवाया, मोदी को चुनाव जीतने के लिए इमरान खान मदद कर रहा है, बालाकोट पर बमबारी इमरान खान की सहमति से हुई हैं”

Fact check/ Verification

पुलवामा हल्ला आणि त्यानंतर झालेले सर्जिकल स्ट्राईक अशा तणावाच्या काळात पाकिस्तानी युद्ध विमानांवर हल्ला करून शूरता दाखविलेले आणि विमान दुर्घटना होऊन पाकिस्तानात अडकल्यानंतर सुटका होऊन यशस्वीरीत्या भारतात परतू शकलेले विंग कमांडर अभिनंदन यांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात असे विधान केले आहे का? याचा आम्ही किवर्ड सर्च च्या माध्यमातून शोध घेतला. मात्र कोणतीच माहिती हाती लागली नाही. इतके मोठे आणि वादाचे विधान केलेले असल्यामुळे यासंदर्भात काही मीडिया रिपोर्ट्स आहेत का? याचाही आम्ही शोध घेतला, मात्र तसे काहीच उपलब्ध झाले नाही.

यानंतर आम्ही विंग कमांडर अभिनंदन यांचे काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत का? याचा शोध घेतला. दरम्यान आम्हाला इंडियन एअरफोर्स ने ६ मार्च २०१९ रोजी केलेले एक ट्विट सापडले.

विंग कमांडर अभिनंदन यांचे अकाउंट असल्याचे सांगून कार्यरत फेक अकाउंट वरील माहितीवर विश्वास ठेऊ नका. अभिनंदन यांचे अधिकृत खाते फेसबुक, इंस्टाग्राम किंवा ट्विटर अशा कोणत्याही ठिकाणी नसल्याचे या ट्विट मध्ये आम्हाला वाचायला मिळाले. यावरून विंग कमांडर अभिनंदन यांनी कोणत्याही सोशल माध्यमावरून असे ट्विट केले असण्याचा प्रश्न येत नसल्याचे आमच्या निदर्शनास आले. त्यांनी जाहीरपणे असे विधान मीडियासमोर केल्याचेही आढळले नाही.

दरम्यान व्हायरल दाव्यामध्ये वापरले जात असलेल्या पेपर कटिंग संदर्भात आम्ही शोध घेतला. गुगल रिव्हर्स इमेज सर्च च्या माध्यमातून व्हायरल पेपर कटिंग चा शोध घेताना आम्हाला एक पेपर कटिंग सापडले. त्यामधील काही भाग कापून व्हायरल दाव्यात वापरला जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

व्हायरल दाव्यासंदर्भात विश्वास न्यूज ने १६ मे २०१९ रोजी फॅक्ट चेक केले होते. यासंदर्भात १८ मे २०१९ रोजी विश्वास न्यूज चे मीडिया पार्टनर असलेल्या दैनिक जागरण ने स्वतंत्र बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीतील काही भाग कापून त्याचा अर्थ विंग कमांडर अभिनंदन यांनी भाजप आणि पुलवामा हल्ला यासंदर्भात वादाचे विधान केले असा समज पसरविला जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली.

व्हायरल दाव्यात विंग कमांडर अभिनंदन याचा वापरण्यात आलेला फोटोही तो पाकिस्तान लष्कराच्या ताब्यात असताना रिलीज करण्यात आलेल्या व्हिडिओमधून घेण्यात आला असल्याचे आमच्या निदर्शनास आले. द सन नावाच्या युट्युब चॅनेल ने १ मार्च २०१९ रोजी अपलोड केलेला व्हिडीओ पाहिल्यास हा फोटोही याच व्हिडिओतून क्रॉप करून घेण्यात आला असून तो सध्याचा नसून जुना असल्याचे दिसून येते.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात पुलवामा हल्ला हा भाजपचा विचारपूर्वक डाव असल्याचे विधान विंग कमांडर अभिनंदन ने केले असे सांगणारा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Result: False

Our Sources

Article published by AajTak on February 12, 2020

Tweet made by Indian Airforce on March 6, 2019

Article published by Vishwas News on May 16, 2019

News published by Dainik Jagaran on May 18, 2019

Video published by The Sun on March 1, 2019


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: +91 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular