Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
सोशल मीडियावर एका तरुणीचा फोटो व्हायरल झाला आहे. यात तरुणी हाॅस्पिटलमधील बेड पडली असून तिच्यावर उपचार चालू असल्याचे दिसते. दावा करण्यात आला हा फोटो माॅडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचा आहे.
मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेला पती सॅम अहमद बॉम्बे याने बेदम मारहाण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तिला आता पतीचा सेक्युलरपणा लक्षात आला असेलही असेही पोस्टमध्ये म्हटले आहे.
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेली मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी तिचे नाव कोणत्याही वादामुळे नाही तर तिचा पती सॅम अहमद बॉम्बे याने केलेल्या मारहाणीमुळे चर्चेत आले आहे.
पूनम पांडे आणि Sam Bombay Ahmed यांची गेल्या वर्षी जुलै महिन्यात एंगेजमेंट झाली आणि 10 सप्टेंबरला लग्न झाले. पूनम पांडेने व्यवसायाने चित्रपट निर्माता सॅम अहमद बॉम्बे यांच्याविरुद्ध लग्नाच्या तीन आठवड्यांनंतरच मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता.
पण सध्या माॅडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेला तिचा पती सॅम अहमद बॉम्बेने या बेदम मारहाण केल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असा दावा करणारा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
Fact Check/Verification
मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचा पती सॅम अहमद बॉम्बे याने तिला बेदम मारहाण केल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याच्या दाव्याने व्हायरल होत असलेल्या फोटोची पडताळणी करण्यासाठी, आम्ही ‘पूनम पांडे हाॅस्पिटल’ या कीवर्डच्या आणि फोटोच्या साहाय्याने शोध घेतला, आम्हाला व्हायरल फोटो प्रमाणेच आणखी दोन फोटो मिळाले.
गुगल सर्चमधून मिळालेल्या पहिल्या इमेजच्या मदतीने आम्हाला दैनिक जागरणने 15 सप्टेंबर 2018 रोजी प्रकाशित केलेला रिपोर्ट मिळाला. दैनिक जागरणच्या या वृत्तानुसार, ‘पूनम हत्या प्रकरणाची एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अर्शी पांडेला गुरुवारी 18 दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दुपारी कुटुंबीय त्याला घेऊन घरी गेले. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने घरावर पोलिसांचा पहारा असणार आहे. त्याच्या सुरक्षेत दोन जवान सदैव तैनात असतील. याशिवाय पीएसीचे जवानही त्या भागात गस्त घालतील. गोरापाडव येथील वाहतूकदार लक्ष्मी दत्त पांडे यांची पत्नी पूनम पांडे यांची रात्री उशिरा घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली. त्याचवेळी मुलगी अर्शी गंभीर जखमी झाली. तेव्हापासून अर्शीवर नैनिताल रोडवरील कृष्णा हॉस्पिटलमध्ये पोलिस संरक्षणात उपचार सुरू होते. हॉस्पिटलमधील डॉ. हरभजन सिंग यांनी सांगितले की, दाखल करण्यापूर्वी तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. याशिवाय जबड्याचे ऑपरेशनही करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर दुपारी कुटुंबीय त्याला घेऊन घरी निघून गेले.
गुगल सर्चमधून मिळालेल्या दुसऱ्या इमेजच्या मदतीने,Amit bhadana या यूट्यूब चॅनेलने 24 सप्टेंबर 2018 रोजी प्रकाशित केलेला व्हिडिओ आढळून आला, हल्दवानी हत्याकांडातील मृत पूनम पांडे यांची मुलगी जखमी मुलगी अर्शी पांडेबाबत एक महत्त्वाचे विधान प्रसिद्ध करण्यात आले होते.
जेव्हा आम्ही व्हायरल फोटोबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी Twitter Advanced Search Tool चा वापर केला, तेव्हा मृतक महिलेच्या मुलीच्या विधानाचे अनेक मीडिया रिपोर्ट्स आणि YouTube व्हिडिओ समोर आले. तथापि, यापैकी बहुतेक हटविले गेले आहेत किंवा सध्या अस्तित्वात नाहीत. ETVBharat उत्तराखंडने शेअर केलेल्या आणि एका अहवालाच्या संग्रहित आवृत्तीमध्ये, आम्हाला घटनेशी संबंधित इतर माहिती देखील मिळाली, परंतु व्हायरल फोटोबद्दल कोणतीही ठोस माहिती मिळू शकली नाही.
Conclusion
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे की, मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचा पती सॅम अहमद बॉम्बे याने तिला बेदम मारहाण केल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्याच्या नावाखाली शेअर केले जाणारे हे छायाचित्र 2018 पासून इंटरनेटवर आहे. अभिनेत्रीने तिच्या पतीवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला हे खरे असले तरी, व्हायरल झालेल्या फोटोचा या घटनेशी संबंध नाही.
Result: Misleading
Our Sources
Report by Dainik Jagran: https://www.jagran.com/uttarakhand/nainital-arshi-discharge-from-hospital-18427951.html
YouTube video published by Amit badhana: https://www.youtube.com/watch?v=Rtm9jWEeIkk
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.