Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘जनतेला लुटण्याच्या १०० आयडिया’ पुस्तकाचे प्रकाशन केले.
Fact
एडिटेड फोटोच्या माध्यमातून हा दिशाभूल करणारा दावा करण्यात आला आहे. मूळ चित्र काँग्रेसचा न्यायपत्र हा जाहीरनामा प्रकाशित करतानाचे आहे.
‘जनतेला लुटण्याच्या १०० आयडिया’ पुस्तकाचे प्रकाशन राहुल गांधींनी केले, असे सांगणारा ‘अनुभवी लुटारू…’ या शीर्षकाचा दावा सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. X वर करण्यात आलेला हा दावा सध्या व्हाट्सअपच्या माध्यमातून शेयर केला जात आहे.
या दाव्यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या हातात दोन पुस्तके घेऊन उभे आहेत. एका हातात इंग्रजी नाव असलेले पुस्तक आहे. त्यावर “How to loot people 101” असे इंग्रजीत लिहिलेले आहे. दुसऱ्या हातातील पुस्तकावर “जनतेला लुटण्याच्या १०० आयडिया” असे मराठीत लिहिलेले आहे. पुस्तकावरील चित्रात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांचे फोटो आहेत.
या दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
व्हायरल दाव्याचा तपास करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम हा दावा करणाऱ्या x युजर @Mahabighadi चा बायो तपासून पाहिला. संबंधित युजरने “बिघाडीच्या बोक्यांनी घातलाय उच्छाद, नादी लागला तो झाला बरबाद! होउदे आता राडा, लावायचा यास्नी घोडा!” या शीर्षकाखाली आपले खाते चालविल्याचे आणि महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून बनलेल्या महाविकास आघाडी विरोधात अनेक पोस्ट केल्याचे आमच्या निदर्शनास आले.
त्यानंतर आम्ही व्हायरल चित्रावर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला @IndianNationalCongress या काँग्रेसच्या अधिकृत युट्युब चॅनेलने ५ एप्रिल २०२४ रोजी Live केलेला एक व्हिडीओ मिळाला.
एकूण १ तास २ मिनिटे आणि ४ सेकंदाच्या या Live चे “LIVE: Congress party Manifesto launch for 2024 Lok Sabha elections | Haath Badlega Halaat” असे शीर्षक होते. काँग्रेसच्या ‘न्याय पत्र’ या जाहीरनाम्याचा प्रकाशन करण्याचा हा कार्यक्रम असल्याचे आणि ३ मिनिटे ४९ सेकंदावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच राहुल गांधी, सोनिया गांधी व पी चिदम्बरम आदी नेत्यांच्या हस्ते प्रकाशन झाल्याचे येथे पाहता येईल.
व्हायरल दाव्यातील राहुल गांधी यांचा फोटो आणि संबंधित व्हिडिओतील जाहीरनामा प्रकाशनादरम्यानचा स्क्रिनशॉट यांचे आम्ही बारकाईने परीक्षण केले असता मूळ चित्रातील हातात असलेल्या पुस्तकांमध्ये एडिटिंग तंत्राचा वापर करून बदल करण्यात आला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
मूळ चित्रात वाढीव मजकूर घालण्यात आल्याचे निदर्शनास येताच, आम्ही किवर्ड सर्चच्या माध्यमातून काँग्रेच्या न्याय पत्र या जाहीरनाम्यासंदर्भात आम्ही शोध घेतला. आम्हाला लोकसत्ता ने ६ एप्रिल २०२४ रोजी प्रसिद्ध केलेली बातमी सापडली. यामध्येही काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असल्याची माहिती असून त्याबद्दलचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.
आमच्या तपासात हे स्पष्ट झाले कि, व्हायरल फोटो एडिटेड आहे. मूळ फोटोमध्ये राहुल गांधींच्या हातात “भारतीय राष्ट्रीय काँग्रेस न्यायपत्र 2024” शीर्षक असलेला जाहीरनामा आहे. एडिटेड फोटो दिशाभूल करून व्हायरल करण्यात आला आहे.
Our Sources
Video published by INC on April 5, 2024
News published by Loksatta on April 6, 2024
Self Analysis
Google Search
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Runjay Kumar
July 8, 2025
Prasad S Prabhu
June 24, 2025
Prasad S Prabhu
May 26, 2025