Sunday, April 13, 2025
मराठी

Fact Check

महाराष्ट्रातील एका आंदोलनाचा ६ वर्षे जुना व्हिडिओ राणा सांगा वादाशी जोडून होतोय शेअर

Written By Komal Singh, Translated By Prasad S Prabhu, Edited By JP Tripathi
Apr 3, 2025
banner_image

Claim

image

राणा सांगा वादामुळे झालेल्या निदर्शनाचा हा व्हिडिओ आहे.

Fact

image

हा व्हिडिओ ६ वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाचा आहे.

उत्तर प्रदेशातील राणा सांगा वाद थांबण्याचे चिन्ह दिसत नाहीये. समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांनी २१ मार्च २०२५ रोजी राज्यसभेत राणा सांगा यांच्यावर भाष्य करताना त्यांना देशद्रोही म्हटले. त्यांच्या या टिप्पणीनंतर मोठा वाद सुरू झाला आहे. २६ मार्च रोजी आग्रा येथे, करणी सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रामजी लाल सुमन यांच्या घराबाहेर जमले आणि त्यांनी गोंधळ घातला. त्यांच्या निवासस्थानी झालेल्या गोंधळादरम्यान, पोलिस आणि करणी सेनेमध्ये चकमक झाली ज्यामध्ये अनेक पोलिसही जखमी झाले. या वादामुळे उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी निदर्शने होत आहेत.

राणा सांगा वादामुळे सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये, एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. २९ मार्च २०२५ रोजी बनवलेल्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये (आर्काइव्ह) २५ सेकंदांचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये लोकांचा जमाव मोठ्या पोलिस दलाच्या मागे धावताना दिसत आहे. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘महाराणा सांगाजींच्या सन्मानार्थ, राजपूत मैदानात.’ जय राजपुताना.’ अशा इतर पोस्टचे संग्रहण येथे, येथे आणि येथे पहा.

महाराष्ट्रातील एका आंदोलनाचा ६ वर्षे जुना व्हिडिओ राणा सांगा वादाशी जोडून होतोय शेअर
Courtesy: Insta@sandeep_thakur_0923

Fact Check/Verification

दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही व्हायरल क्लिपच्या मुख्य फ्रेम्सचे गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. या काळात, आम्हाला २०१८ मध्ये केलेल्या अनेक सोशल मीडिया पोस्टमध्ये हा व्हिडिओ दिसला. आम्हाला ६ वर्षांपूर्वी टॉकिंग टेल्स इंडिया नावाच्या यूट्यूब चॅनेलने अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये व्हायरल क्लिपची एक मोठी आवृत्ती सापडली. व्हायरल व्हिडिओ इंटरनेटवर ६ वर्षांपासून असल्याने, हे स्पष्ट आहे की हा व्हिडिओ सध्या सुरू असलेल्या राणा सांगा वादाशी संबंधित नाही. २७ जुलै २०१८ रोजी अपलोड केलेल्या युट्यूब व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तो मराठा चळवळीतील असल्याचे वर्णन केले आहे.

महाराष्ट्रातील एका आंदोलनाचा ६ वर्षे जुना व्हिडिओ राणा सांगा वादाशी जोडून होतोय शेअर
YT/Talking Tales

आमच्या तपासादरम्यान, आम्हाला २५ जुलै २०१८ रोजी टाईम्स ऑफ इंडियाचे पत्रकार मोहम्मद अखीफ यांनी केलेल्या एक्स-पोस्टमध्ये व्हायरल क्लिपचा एक मोठा व्हर्जन देखील सापडला. पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की व्हिडिओमध्ये दिसणारी घटना महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील आहे. कॅप्शनमध्ये म्हटले आहे की २४ जुलै २०१८ रोजी, हिंसक आंदोलकांच्या समोर गोदावरी नदीवरील कैगाव टोका पुलावरून पोलिस माघार घेत असल्याचे दिसून येते. (अनुवादित)

महाराष्ट्रातील एका आंदोलनाचा ६ वर्षे जुना व्हिडिओ राणा सांगा वादाशी जोडून होतोय शेअर
X@MohammedAkhef

व्हायरल क्लिपशी संबंधित अधिक माहिती मिळविण्यासाठी, आम्ही गुगलवर संबंधित कीवर्ड शोधले. या काळात आम्हाला व्हायरल क्लिपशी संबंधित अनेक बातम्या सापडल्या. २०१८ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या मराठा आंदोलनाशी याचा संबंध जोडल्याचे वृत्त आहे. २६ जुलै २०१८ रोजी इंडिया टुडेने प्रकाशित केलेल्या वृत्तात म्हटले आहे की हा व्हिडिओ औरंगाबादमधील मराठा आरक्षण निदर्शनांदरम्यान काढण्यात आला होता. असे म्हटले जाते की या वेळी निदर्शक पोलिसांवर हल्ला करताना आणि त्यांना हाकलून लावताना दिसले.

महाराष्ट्रातील एका आंदोलनाचा ६ वर्षे जुना व्हिडिओ राणा सांगा वादाशी जोडून होतोय शेअर
YT/India Today

या प्रकरणावर टीव्ही 9 मराठी आणि महाराष्ट्र टाईम्सने प्रकाशित केलेल्या वृत्तांमध्ये व्हायरल क्लिपमध्ये दिसणारे दृश्ये समान आहेत. त्यात म्हटले आहे की ही दृश्ये २४ जुलै २०१८ ची आहेत. त्यादरम्यान, आंदोलकांनी औरंगाबादमधील कायगाव टोका पुलावर हिंसक निदर्शने केली होती आणि पोलिसांना हाकलून लावले होते. हे आंदोलन ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी होते.

महाराष्ट्रातील एका आंदोलनाचा ६ वर्षे जुना व्हिडिओ राणा सांगा वादाशी जोडून होतोय शेअर
YT/Maharashtra Times

Conclusion

तपासानंतर, आम्ही असा निष्कर्ष निघाला की राणा सांगा वादाच्या संदर्भात शेअर केला जात असलेला व्हिडिओ ६ वर्षांपूर्वी औरंगाबाद, महाराष्ट्र येथे ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यानचा आहे.

OurSources

Video posted by Talking Tales Youtube Channel on 27th July 2018.
X post by Mohammed Akhef TOI on 24th July 2018.
YouTube Report by India Today shared on 26th July 2018.
A Report by TV9 Marathi shared on 24th July, 2018.
A Report by Maharashtra Times shared on 24th July 2018.

RESULT
imageFalse
image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,713

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.