Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact Checkइस्रायल-पॅलेस्टाईन वादाच्या दरम्यान पिंजऱ्यात कैद झालेल्या मुलांच्या व्हायरल व्हिडिओबद्दल न्यूजचेकरला आतापर्यंत मिळाली...

इस्रायल-पॅलेस्टाईन वादाच्या दरम्यान पिंजऱ्यात कैद झालेल्या मुलांच्या व्हायरल व्हिडिओबद्दल न्यूजचेकरला आतापर्यंत मिळाली ही माहिती, वाचा हा रिपोर्ट

लहान मुलांना पिंजऱ्यात ठेवल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे ज्याचा संबंध अलीकडच्या इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाशी जोडला जात आहे. हा व्हिडिओ शेअर करताना काही युजर्स दावा करत आहेत की हमासच्या सैनिकांनी इस्रायली मुलांना पकडले आहे, तर काही यूजर्स दावा करत आहेत की ही पॅलेस्टिनी मुले आहेत, ज्यांना इस्रायलने पकडले आहे.

आम्ही या रिपोर्टमध्ये व्हिडिओबद्दल जास्तीत जास्त माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ तपासण्यासाठी आम्ही इतर अनेक तथ्य तपासणी लेखांचीही मदत घेतली आहे.

खरे तर 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संगीत महोत्सवावर मोठा हल्ला झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी पॅलेस्टाईनच्या हमास या संघटनेने घेतली होती, ज्याला अमेरिका आणि इंग्लंडसह अनेक देशांनी दहशतवादी संघटना घोषित केले आहे. या हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागला. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलनेही युद्धाची घोषणा केली. इस्रायलने हमासच्या अनेक लष्करी तळांवर हल्ले केले. या संघर्षात आतापर्यंत हजारो इस्रायली आणि पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, सुमारे 34 सेकंदांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये काही मुले पिंजऱ्यात कैद झालेली दिसत आहेत आणि त्याचवेळी पार्श्वभूमीतून एका व्यक्तीच्या हसण्याचा आवाजही ऐकू येतो. व्हिडिओमध्ये टिकटॉक अकाउंटचा वॉटरमार्क देखील आहे.

हा व्हिडिओ अनेक व्हेरिफाईड अकाउंट धारकांनी, व्हिडिओमध्ये दिसणारी मुले इस्रायली आहेत, ज्यांना हमासच्या सैनिकांनी कैद केले आहे. असा दावा करून शेअर केला आहे.

इस्रायल-पॅलेस्टाईन वादाच्या दरम्यान पिंजऱ्यात कैद झालेल्या मुलांच्या व्हायरल व्हिडिओबद्दल न्यूजचेकरला आतापर्यंत मिळाली ही माहिती, वाचा हा रिपोर्ट

त्याच वेळी, काही X युजर्सनी पिंजऱ्यात अडकलेल्या या मुलांचे पॅलेस्टिनी असे वर्णन केले आहे.

इस्रायल-पॅलेस्टाईन वादाच्या दरम्यान पिंजऱ्यात कैद झालेल्या मुलांच्या व्हायरल व्हिडिओबद्दल न्यूजचेकरला आतापर्यंत मिळाली ही माहिती, वाचा हा रिपोर्ट

Verification

व्हायरल व्हिडिओची तपासणी करण्यासाठी, आम्ही प्रथम व्हिडिओमध्ये दिसलेल्या TikTok खाते user6903068251281 ची तपासणी केली. भारतात TikTok वर बंदी असल्यामुळे VPN च्या मदतीने आम्ही खाते शोधले, परंतु आम्हाला या खात्यावर व्हायरल व्हिडिओ आढळला नाही.

इस्रायल-पॅलेस्टाईन वादाच्या दरम्यान पिंजऱ्यात कैद झालेल्या मुलांच्या व्हायरल व्हिडिओबद्दल न्यूजचेकरला आतापर्यंत मिळाली ही माहिती, वाचा हा रिपोर्ट

यानंतर, आम्ही संबंधित कीवर्डच्या मदतीने ट्विटरवर शोध घेतला. आम्हाला 8 ऑक्टोबर 2023 रोजी हिब्रू फॅक्ट चेक संस्था फेक रिपोर्टरचे ट्विट आढळले. या ट्विटमध्ये, व्हायरल व्हिडिओची दृश्ये शेअर करताना, त्याने म्हटले आहे की हा व्हिडिओ 4 ऑक्टोबर रोजी पोस्ट करण्यात आला होता, अर्थात टिक टॉक अकाउंट user6903068251281 च्या चार दिवस ट्विट केला होता.

इस्रायल-पॅलेस्टाईन वादाच्या दरम्यान पिंजऱ्यात कैद झालेल्या मुलांच्या व्हायरल व्हिडिओबद्दल न्यूजचेकरला आतापर्यंत मिळाली ही माहिती, वाचा हा रिपोर्ट

प्रत्यक्षात 7 ऑक्टोबरपासून इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष सुरू झाला. त्यामुळे हे प्रकरण संशयास्पद वाटल्यावर आम्ही आमचा तपास सुरू केला. या वेळी, आम्हाला स्पॅनिश तथ्य तपासणी आउटलेट Maldita.es च्या वेबसाइटवर 9 ऑक्टोबर 2023 रोजी प्रकाशित झालेला रिपोर्ट आढळला.

इस्रायल-पॅलेस्टाईन वादाच्या दरम्यान पिंजऱ्यात कैद झालेल्या मुलांच्या व्हायरल व्हिडिओबद्दल न्यूजचेकरला आतापर्यंत मिळाली ही माहिती, वाचा हा रिपोर्ट

या रिपोर्टमध्ये, त्याच TikTok खात्यावरून 8 ऑक्टोबर 2023 रोजी अपलोड केलेल्या दुसर्‍या व्हिडिओची कॅच आवृत्ती समाविष्ट केली आहे. या व्हिडीओमध्ये काही मुले एका जागी बसलेली दिसत असून, व्हायरल झालेल्या व्हिडीओतील एक बालकही त्यात आहे. टिक टॉकवरील या व्हिडिओसोबतच्या अरबी कॅप्शनमध्ये असे दिसते की ‘चिनी लोकांकडे काही उपाय नाही.’

इस्रायल-पॅलेस्टाईन वादाच्या दरम्यान पिंजऱ्यात कैद झालेल्या मुलांच्या व्हायरल व्हिडिओबद्दल न्यूजचेकरला आतापर्यंत मिळाली ही माहिती, वाचा हा रिपोर्ट

तपासादरम्यान, आम्हाला 8 ऑक्टोबर 2023 रोजी या टिकटोक खात्यावरून पोस्ट केलेला आणखी एक व्हिडिओ देखील सापडला. या व्हिडिओमध्ये अकाऊंटच्या मालकाने व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत प्रश्न विचारला की, ‘ही मुले ज्यू आहेत का?’ तसेच त्याने असा दावा केला की “ही मुले माझ्या ओळखीची आहेत. सर्व मुले पॅलेस्टिनी आहेत, ज्यू नाहीत.

इस्रायल-पॅलेस्टाईन वादाच्या दरम्यान पिंजऱ्यात कैद झालेल्या मुलांच्या व्हायरल व्हिडिओबद्दल न्यूजचेकरला आतापर्यंत मिळाली ही माहिती, वाचा हा रिपोर्ट

आमच्या तपासादरम्यान आम्ही त्या टिकटॉक युजरशी संपर्क साधण्याचा देखील प्रयत्न केला आहे, त्यांनी प्रतिसाद दिल्यावर लेख अपडेट केला जाईल.

यानंतर, आम्ही आमचा तपास पुढे नेला आणि व्हिडिओमध्ये उपस्थित ऑडिओ शोधला.

यासाठी, आम्ही हिब्रू फॅक्ट चेक संस्था फेक रिपोर्टरने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये दिसणार्‍या ऑडिओ स्ट्रिपमध्ये अरबी भाषेत लिहिलेला मजकूर कॉपी केला.

इस्रायल-पॅलेस्टाईन वादाच्या दरम्यान पिंजऱ्यात कैद झालेल्या मुलांच्या व्हायरल व्हिडिओबद्दल न्यूजचेकरला आतापर्यंत मिळाली ही माहिती, वाचा हा रिपोर्ट

जेव्हा आम्ही मजकूर कॉपी केला आणि तो TikTok वर शोधला तेव्हा आम्हाला आढळले की हा ऑडिओ बऱ्याच काळापासून इंटरनेटवर आहे.

इस्रायल-पॅलेस्टाईन वादाच्या दरम्यान पिंजऱ्यात कैद झालेल्या मुलांच्या व्हायरल व्हिडिओबद्दल न्यूजचेकरला आतापर्यंत मिळाली ही माहिती, वाचा हा रिपोर्ट

Conclusion

Newschecker या अपडेट्सवर सतत निरीक्षण करत आहे आणि अधिक माहिती उपलब्ध झाल्यावर हा रिपोर्ट अपडेट केला जाईल. आम्ही आमच्या वाचकांना विनंती करतो की अशा व्हायरल दाव्यांवर विश्वास ठेवू नका कारण व्हिडिओचे स्थान आणि तो शूट केल्याची तारीख यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

Our Sources
Fake Reporter X account: Tweet on 8th October 2023
Maldita Fact Check: Article Published on 9th October 2023
user6903068251281 Tik Tok Account: Video Shared on 8th October 2023

(हा लेख न्यूजचेकर हिंदीसाठी सर्वप्रथम रुंजय कुमार यांनी लिहिला आहे.)

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in

फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Most Popular