Claim
ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक यांनी हिंदू रितीरिवाजांचे पालन करत 10 डाऊनिंग स्ट्रीट येथील घरात प्रवेश केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.हा दावा ऋषी आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांच्या व्हिडिओद्वारे करण्यात येत आहे.10 डाउनिंग स्ट्रीट हे ब्रिटनच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान आणि कार्यालय आहे.
Fact Check
व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून करण्यात येत असलेला दावा खोटा आहे.ऋषी सुनक यांचा हा व्हिडिओ अलीकडचा नसून दोन महिन्यांहून अधिक जुना आहे.ऋषी त्याची पत्नी अक्षता मूर्तीसोबत जन्माष्टमी साजरी करण्यासाठी इंग्लंडमधील वॅटफोर्ड टाऊनमधील भक्तिवेदांत मनोर मंदिरात पोहोचले होते तेव्हाचा हा व्हिडिओ आहे.
ऋषी यांनी स्वतः 18 ऑगस्ट 2022 रोजी त्यांच्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवर त्याचे फोटो शेअर केले होते.या फोटोंमध्ये ऋषी आणि अक्षता यांनी अगदी तसेच कपडे घातले आहेत, जे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
18 ऑगस्ट 2022 रोजी भक्तिवेदांत मंदिराच्या फेसबुक पेजवरून ऋषी आणि अक्षता यांची छायाचित्रे देखील पोस्ट करण्यात आली होती.व्हायरल व्हिडीओसोबत या छायाचित्रांची सांगड घातली असता,दोन्ही एकाच ठिकाणचे आणि कार्यक्रमाचे असल्याची पुष्टी होते.

ऋषी सुनक मंदिरात पोहोचल्याच्या अनेक बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या.त्यावेळी ऋषी ब्रिटनचे पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत होते आणि नंतर लिझ ट्रस यांच्याकडून पराभूत झाले.पण ट्रसने ४५ दिवसांनी राजीनामा दिला आणि सुनक हे ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान झाले.
अशाप्रकारे,आमच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की व्हायरल व्हिडिओ ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होण्यापूर्वीचा आहे.तो चुकीचा दावा करून सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
Result:False
जर तुम्हाला ही वस्तुस्थिती तपासणी आवडली असेल आणि अशा आणखी तथ्य तपासण्या वाचायच्या असतील तर,येथे क्लिक करा.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी,दुरुस्तीसाठी किंवा इतर सूचनांसाठी,आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल: checkthis@newschecker.in