Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पवार यांना अदानींकडून पाचशे कोटी मिळाले.
Fact
जुने विजुअल्स आणि खोटा व्हॉइस ओव्हर वापरून एबीपी Live च्या नावाने खोटा व्हिडीओ बनवून हा दावा करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पवारांना अदानींकडून पाचशे कोटी मिळाले. असा दावा सध्या केला जात आहे. फेसबुक आणि X च्या माध्यमातून हा दावा झाला आहे.
दाव्यांचे संग्रहण इथे आणि इथे पाहता येईल.
“शरद पवारांचा केंद्रीय “मालक” राहुल गांधी रोज उठून अदानी ला शिव्या घालतो, आणि महाराष्ट्रात शरद पवार आणि रोहित पवार अदानी कडून देणग्या घेतात. आता परत हे 500 कोटींचं गौडबंगाल वेगळंच.” अशा कॅप्शनखाली हा दावा करण्यात येत असून ब्रेकिंग न्यूज च्या माध्यमातून एक व्हिडीओ शेयर केला जात आहे.
संबंधित व्हिडिओमध्ये सुरुवातीला आणि शेवटी एबीपी Live चा लोगो तसेच रोहित पवार आणि अदानी दिसत असलेले काही व्हिज्युअल्स जोडत व्हॉइस ओव्हर जोडण्यात आला आहे. “देशातल्या एका मोठ्या उद्योगपतींकडून कर्जतचे आमदार रोहित पवार यांना पाचशे कोटी मिळाल्याची धक्कादायक माहिती आता पुढे येतीये. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अदानींकडून रोहित पवारांना हे पैसे मिळाल्याची चर्चा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी ही बातमी आहे. रोहित पवारांना निवडणुकीमध्ये मदत म्हणून पाचशे कोटी रुपये दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. रोहित पवार हे शरद पवार गटाचे आमदार आहेत. निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेणार? हे पाहणं आत्ता महत्वाचं ठरणार आहे.” असे संबंधित व्हिडिओचा व्हाईस ओव्हर सांगतो.
व्हायरल दाव्याच्या चौकशीसाठी आम्ही सर्वप्रथम Google वर शोध घेतला. संबंधित कीवर्डसच्या माध्यमातून शोध घेतल्यानंतर आम्हाला यासंदर्भात कोणतीच माहिती मिळाली नाही.
दरम्यान व्हायरल व्हिडिओत ज्या एबीपी चॅनेलचा लोगो वापरण्यात आला आहे त्या चॅनेलच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर अशाप्रकारची कोणती बातमी प्रसारित करण्यात आली आहे का? हे आम्ही शोधून पाहिले. मात्र चॅनेलच्या व्हिडीओ लिस्टमध्ये X खात्यावर किंवा फेसबुक पेजवर आम्हाला ही बातमी मिळाली नाही.
दरम्यान पुढील तपासासाठी आम्ही एबीपी माझाचे डिजीटलचे एडिटर सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी “हे एबीपी माझाचे नाही, एबीपीच्या नावे खोडसाळपणा केला आहे, याबाबत आम्ही कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहोत.” अशी माहिती दिली. यावरून एबीपी माझा चा लोगो वापरून बनावट व्हिडिओच्या माध्यमातून खोटा दावा करण्यात आला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
विशेष म्हणजे संबंधित व्हायरल व्हिडिओमध्ये रोहित पवार आणि उद्योजक गौतम अदानी यांचे एकत्रित व्हिज्युअल्स वापरण्यात आले आहेत. ते नेमके कुठले आहेत? हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्हाला 16 जून 2022 रोजी TV9 मराठी ने अपलोड केलेला एक व्हिडीओ आढळला. उद्योजक गौतम अदानी यांच्या बारामती भेटीवेळी रोहित पवार यांनी विमानतळावरून त्यांचे स्वागत करून त्यांच्या वाहनाचे सारथ्य केले होते. त्यावेळचे व्हिज्युअल्स व्हायरल व्हिडिओत वापरण्यात आले असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
यासंदर्भातील तुलनात्मक परीक्षण खाली पाहता येईल.
दरम्यान आम्ही आमदार रोहित पवार यांच्याशीही संपर्क साधला. त्यांच्याकडूनही हा दावा खोटा आणि हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया आम्हाला मिळाली.
अशाप्रकारे आमच्या तपासात विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पवार यांना अदानींकडून पाचशे कोटी मिळाले हा दावा जुने विजुअल्स आणि खोटा व्हॉइस ओव्हर आणि एबीपी Live चा लोगो वापरून बनविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. संबंधित चॅनेलनेही याचे खंडन केले असून दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.
Our Sources
Google Search
Youtube Channel of ABP Majha
Conversation with Editor, ABP Digital
video uploaded by TV9 Marathi on June 16, 2022
Conversation with NCP MLA Rohit Pawar
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Salman
July 3, 2025
Kushel Madhusoodan
July 2, 2025
Vasudha Beri
July 1, 2025