Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact Checkकेईएम हॉस्पिटलमध्ये काही तासात पक्षघात बरा करणारी मशीन उपलब्ध झालेली नाही, चुकीचा...

केईएम हॉस्पिटलमध्ये काही तासात पक्षघात बरा करणारी मशीन उपलब्ध झालेली नाही, चुकीचा दावा व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

केईएम हॉस्पिटलमध्ये अवघ्या काही तासात पक्षघात बरा करणारी मशीन उपलब्ध झाली असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. आम्हाला व्हाट्सअॅपवर आलेल्या मॅसेजमध्ये म्हटले आहे की, “के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये पक्षघात (प्यारालेसीस /लकवा )या आजारावर अँटोमॅटिक या मशीन द्वारे काही तासातच रुग्ण पूर्ववत बरा होतो, मेंदूच्या गाठी या मशीनच्या सहाय्याने एन्जोप्लाष्टी प्रमाणे काढुन टाकल्या जातात, तसेच भारतात प्रथम याच हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध झाली आहे.जगभरात काही ठराविक अशा मशीन आहेत, सदर मशीन हाताळण्यात डॉ. नितीनजी डांगे हे जगप्रसिद्ध आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सदर मशीनीचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले. माहीती सर्वाना कळवा फायदा होईल”.

Fact Check/Verification

व्हाट्सअॅप वर व्हायरल होत असलेल्या मॅसेजची सत्यता पडताळण्याचे आम्ही ठरविले असता आम्हाला हा मॅसेज मागील दोन वर्षांपासून सोशल मीडियात व्हायरल होत असल्याे आढळून आले.

ट्विटरवर देखील हा मॅसेज व्हायरल झाला होता.

अधिक शोध घेतला असता आम्हाला 3 नोव्हेंबर 2018 रोजीची मुंबई मिरर मध्ये प्रकाशित झालेली बातमी आढळून आली. ज्यात म्हटले आहे की, व्हॉट्सऍपवर व्हायरल होत असलेल्या मॅसेजमुळे परळच्या के.इ.एम हॉस्पिटलमध्ये पॅरलिसीस झालेल्या रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. बृहन्मुंबई महानगरपालिकेने केईएम हॉस्पिटलसाठी 8.5 कोटी रुपये किमतीचे मशीन विकत घेतले आहे. स्ट्रोक आल्यानंतर 24 तासांच्या आत जर या मशीनद्वारे इलाज केला तर रक्तवाहिन्यांमधील गाठी निघू शकतात. त्यामुळे पक्षाघाताचा रुग्ण बरा होण्यास मदत होते, असे या बातमीत म्हटले आहे.

Conclusion

यावरुन हेच सिद्ध होते की, व्हायरल पोस्टमधील दावा चुकीचा आहे. परळमधील केईएम हाॅस्पिटलमध्ये असलेल्या मशीनमध्ये केवळ 24 तासांच्या आतच अर्धांगवायूचा रुग्ण बरा होतो.

Result- Misleading

Sources

Mumabai Mirror-  https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-story/whatsapp-rumour-of-paralysis-cure-sends-patients-haring-to-kem/articleshow/66483449.cms

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular