भारतरत्न सचिन तेंडूलकरने पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवाला खांदा दिल्याच्या दाव्याने एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आज एक गोष्ट समजली, पुरस्कार महत्त्वाचा नसून कर्तृत्व महत्त्वाचं असतं. कारण आज एका पद्मश्रीला भारतरत्नाने खांदा दिला. भावपूर्ण श्रद्धांजली माई”
संग्रहित ट्विट येथे पहा.
हा दावा व्हाट्सअॅपवर देखील मोठ्या म्हणात व्हायरल होत आहे.

तसेच या दाव्याच्या अनेक फेसबुक पोस्ट देखील व्हायरल झाल्या आहेत.
ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या निधनामुळं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवाला पुण्यातील ठोसरपागा श्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नुकतेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर माध्यमांत तसेच सोशल मीडियावर श्रद्धांजलीच्या पोस्ट शेअर होत आहेत अशातच सचिन तेंडूलकरने त्यांच्या पार्थिवाला खांदा दिल्याच्या दाव्याने हा फोटो व्हायरल होत आहे.
Fact check/Verification
सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवाला सचिन तेंडूलकरने खांदा दिला आहे का याची पडताळणी करण्यास सुरुवात केली. मात्र अशी बातमी कुठेही आढळून आली नाही. यानतर आम्ही व्हायरल होत असलेला फोटो रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोधला असता हा फोटो तीन वर्षापूर्वीचा असल्याचे आढळून आले. या संदर्भात इंडियन एक्सप्रेसची 3 जानेवारी 2019 रोजीची बातमी आढळून आली. ज्यात म्हटले आहे की, सचिनचे बालपणीचे प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त रमांकांत आचरकेर यांच्या पार्थिवाला सचिनने खांदा दिला.

अमर उजाला या हिंदी दैनिकाचे देखील वृत्त आढळून आले.

सिंधुताई सपकाळ यांच्या अंत्यसंस्काराची बातमी आढळून आली. मात्र यात कुठेही सचिन तेंडूलकरने सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवाला खांदा दिल्याचा फोटो किंवा उल्लेख आढळून आला नाही.
Conclusion
अशा प्रकारे आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की,सचिनने सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवाला खांदा दिलेला नाही. सचिनने आपले गुरू रमांकांत आचरेकरांच्या पार्थिवाला खांदा दिल्याचा फोटो चुकीच्या दाव्याने व्हायरल झाला आहे.
Result: Misleading
Sources
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.