Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
मराठी माणसाचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी आम्ही एकत्र आलो’ असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी असे कोणतेही विधान केलेले नाही, मूळ भाषणातील संदर्भ बदलून हा दावा करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दावा करण्यात येतोय की शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी अलीकडच्या पत्रकार परिषदेत म्हटलं “मराठी माणसाचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.”

दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
“शेवटी पोटातलं ओठांवर आलच!” अशी कॅप्शन व्हिडिओमध्ये असून पोस्टच्या कॅप्शनमध्ये शेवटी संजय राऊत खरं बोलला” अशी कॅप्शन आम्हाला वाचायला मिळाली.
व्हायरल व्हिडिओच्या शोधासाठी सर्वप्रथम न्यूजचेकरने त्याच्या किफ्रेम्स काढून रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला TV9 मराठी चॅनेलच्या युट्युब अकौन्टने हाच व्हिडीओ २३ ऑक्टोबर २०२५ रोजी अपलोड केला असल्याचे दिसून आले.
‘भाजपचा पराभव करायचाय, अन् राहुल गांधींना पंतप्रधान करायचंय’ असे शीर्षक असलेल्या या व्हिडिओत ८.१५ मिनिटावर एक पत्रकार संजय राऊत यांचे मत विचारण्यापूर्वी, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुती म्हणजेच भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र लढणार असे विधान केले आहे. तसेच ठाण्यातला निर्णय त्यांनी शिंदेंवर सोपविला आहे.” असे सांगतात.
यावर बोलताना संजय राऊत “हा त्यांच्या गटाचा निर्णय आहे. पण या सगळ्यांचे लक्ष्य मुंबई आहे. मुंबईतून मराठी माणसाचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. बाकी इतरत्र नाही. मुंबईत शिवसेनेचा पराभव घडवणे म्हणजे मराठी माणसाचा पराभव घडवणे या विषयी त्यांच्यात एकमत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने जो भगवा झेंडा कायम मुंबईवर फडकवत ठेवला तो उतरवणे हे यांचे अंतिम ध्येय आहे आणि त्याच्यामुळे ते इथे एकत्र यायला तयार आहेत.” असे उदगार काढतात.
Saam TV च्या युट्युब चॅनेलवरही २३ ऑक्टोबर २०२५ रोजी अपलोड केलेल्या व्हिडिओत ८.१५ मिनिटावर समान संभाषण पाहायला मिळते.
यावरून संजय राऊत यांनी भाजप आणि विरोधकांना उद्देशुन हे विधान केल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान अधिक चौकशीसाठी आम्ही खासदार संजय राऊत यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. तेथे “व्हायरल दावा खोटा आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना विरोधकांवर निशाणा साधत बोललेल्या वक्तव्याचे संदर्भ बदलून दिशाभूल केली जात आहे.” अशी माहिती देण्यात आली.
अशाप्रकारे आमच्या तपासात संजय राऊत यांच्या पत्रकारपरिषदेतील विधानांचा संदर्भ बदलून चुकीचा दावा करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले.
Our Sources
Video published by TV9 Marathi on October 23, 2025
Video published by Saam TV on October 23, 2025
Telephonic conversation with MP Sanjay Raut’s office
Vasudha Beri
November 19, 2025
Runjay Kumar
November 17, 2025
Prasad S Prabhu
November 2, 2025