Monday, November 25, 2024
Monday, November 25, 2024

HomeFact CheckFact Check: शिवसेना कार्यकर्त्याने आपल्या खासगी अवयवावर संजय राऊत यांचा टॅटू काढला?...

Fact Check: शिवसेना कार्यकर्त्याने आपल्या खासगी अवयवावर संजय राऊत यांचा टॅटू काढला? एडिटेड आहे तो फोटो

पाठीवर टॅटू काढलेल्या एका व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा टॅटू त्या व्यक्तीच्या पाठीवर तर संजय राऊत यांचा टॅटू खालच्या बाजूला खासगी अवयवावर बनवल्याचे चित्रात दिसत आहे. सोशल मीडिया युजर्स दावा करत आहेत की त्या व्यक्तीने संजय राऊत यांचा टॅटू त्या खालच्या भागावर काढला आहे.

“संजय राऊत यांना जागा दाखवून दिली” किंवा “त्यांना योग्य ठिकाणी गोंदले” अशा कॅप्शन देऊन ही पोस्ट शेयर केली जात आहे.

संबंधित पोस्ट चे संग्रहण आपण येथे पाहू शकता.

Fact Check/ Verification

हा फोटो मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला असल्याने आम्ही व्हायरल इमेजचा रिव्हर्स इमेज सर्च घेतला. यादरम्यान आम्हाला कल्याणी गणेश वाघ या युजरने ट्विटर वर २९ ऑगस्ट २०२२ रोजी पोस्ट केलेले मूळ चित्र सापडले.

Fact Check: शिवसेना कार्यकर्त्याने आपल्या खासगी अवयवावर संजय राऊत यांचा टॅटू काढला? एडिटेड आहे तो फोटो
Courtesy: Twitter@kalyaniwagh8400

या ट्विट मध्ये असलेले छायाचित्र पाहिले असता, आम्हाला त्यामध्ये एका व्यक्तीच्या पाठीवर उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे टॅटू काढण्यात आल्याचे पाहावयास मिळाले. मात्र या चित्रात संजय राऊत यांचा टॅटू दिसला नाही. यावरून आम्ही आणखी तपास केला.

आम्ही यासंदर्भात किवर्ड च्या माध्यमातून शोध घेतला. आम्हाला TV9 मराठीच्या अधिकृत YouTube चॅनेलने २८ ऑगस्ट २०२२ रोजी अपलोड केलेली एक व्हिडीओ न्यूज पाहायला मिळाली. या बातमीनुसार सोलापूर येथील शिवसैनिक रामण्णा जमादार यांनी आपल्या पाठीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे टॅटू काढले आहेत. बातमीत रिपोर्टर ने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना जमादार यांनी टॅटू संदर्भात ठाकरे पितापुत्राचा उल्लेख केला आहे. तसेच संजय राऊत यांचा टॅटू शरीराच्या खासगी अवयवावर काढल्याचा कोणताही उल्लेख किंवा व्हिज्युअल्स आम्हाला पाहायला मिळाले नाहीत.

आणखी शोध घेत असताना आम्हाला मूळ संजय राऊत यांचा टॅटू नसलेले चित्र शिवसैनिक रामण्णा जमादार यांच्या फेसबुक खात्यावरही पाहायला मिळाले.

Fact Check: शिवसेना कार्यकर्त्याने आपल्या खासगी अवयवावर संजय राऊत यांचा टॅटू काढला? एडिटेड आहे तो फोटो
Courtesy: Facebook/ रामण्णा जमादार

व्हायरल आणि मूळ चित्राची तुलना केली असता आम्हाला मूळ चित्रात छेडछाड करून चुकीच्या पद्धतीने संजय राऊत यांचा टॅटू घालण्यात आल्याचे निदर्शनास आले.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात शिवसेना कार्यकर्त्याने आपल्या खासगी अवयवावर संजय राऊत यांचा टॅटू काढल्याचा केला जात असलेला दावा फोटो एडिट करून करण्यात आला असून तो खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. असे निदर्शनास आले.

Result: Altered Media

Our Sources


Tweet made by Kalyani Wagh on August 29, 2022

Video news published by TV9 Matathi on August 28, 2022

Facebook post by Shivsena worker Ramanna Jamadar on August 31,2022


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular