Authors
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केलाय की, मुलीच्या घरच्यांनी हुंड्याची मागणी पूर्ण केली नाही म्हणून मुलाने लग्न तोडण्याची धमकी दिली.
हुंडा ही वाईट पद्धत आहे. ही पद्धत अनेकदा नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण ते पूर्णपणे नष्ट होऊ शकले नाही. पूर्वेकडील काही राज्यांमध्ये ही समस्या इतकी बिकट आहे की, कित्येकदा लग्न मंडपापर्यंत जाऊन देखील नवऱ्याची मागणी पूर्ण झाली नाही तर ते लग्न तोडले जायचे. पण पुढे काळानुसार हुंड्याच्या प्रथेबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली. अजूनही काही ठिकाणी हुंडा देण्या-घेण्याची प्रथा चालू आहे, ज्या घटना हळूहळू आपल्या समोर येतात.
काही गोष्टींमध्ये अन्य राज्यांच्या तुलनेत मागे असणाऱ्या युपी आणि बिहारमध्ये अशा अनेक घटना पाहायला मिळतात. जिथे वेतन आणि सामाजिक स्तर यांच्या आधारे हुंड्याची एक ठराविक रक्कम ठरवली जाते. ही परिस्थिती लक्षात घेऊनच हुंडा प्रतिबंधक कायदा, १९६१ याची तरतूद केली गेली. पण काही ठिकाणी त्याच कायद्याचा दुरुपयोग होतांना दिसत आहे.
यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात मुलीच्या घरच्यांनी हुंड्याची मागणी पूर्ण न केल्यामुळे मुलाने लग्न तोडण्याची धमकी दिली.
Fact Check/Verification
याचा तपास घेण्यासाठी आम्ही त्या व्हिडिओतील एका की-फ्रेमला गुगलवर शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आम्हांला ‘I Hate BJP JDU RJD In Bihar’ नावाच्या फेसबुक पानावर एक व्हिडिओ मिळाला. तो व्हिडिओ Divya Vikram नावाच्या फेसबुक युजरने पोस्ट केला होता.
दिव्या विक्रम नावाच्या फेसबुक युजरचे खाते पाहत असतांना आम्हांला त्याच्याशी निगडित काही अन्य फेसबुक पान आणि यु ट्यूब वाहिनीविषयी माहिती आढळली. ६ मार्च २०२२ रोजी आम्ही त्या फेसबुक युजरशी आणि त्यांच्या फेसबुक पानावर असलेल्या इतरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण या सर्व प्रक्रियेमध्ये आम्हांला कुठलीही माहिती मिळू शकली नाही.
दिव्या विक्रम नावाचे फेसबुक पान विक्रम मिश्रा यांचे आहे. जे स्वतः व्हिडिओ कंटेंट बनवतात. ती आपल्या नवऱ्यासोबत मिळून नाटकाचे व्हिडिओ बनवते. याचबरोबर आम्हांला दिव्या यांच्या पानावर अनेक अशा व्हिडिओ मिळाल्या, ज्या व्हायरल व्हिडिओतल्या आवाजाशी मिळतीजुळती आहे. त्याच पानावर आम्हांला जय मिथिला नावाच्या यु ट्यूब वाहिनीने प्रकाशित केलेला एक व्हिडिओ सापडला. ज्यात व्हायरल व्हिडिओतील सर्व कलाकार दिसत आहे.
त्यांच्याच पानावर आम्हांला विक्रम मिश्रा आणि अन्य काही कलाकारांच्या पानावर काही व्हिडिओ मिळाले. ज्यात सामाजिक विषयांचे नाट्यमय पद्धतीने रूपांतर केले आहे. विक्रम मिश्रा यांच्या फेसबुक पानावरून अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ आमच्याच आहे, असे त्यांनी सांगितले.
या व्यतिरिक्त आम्ही विक्रम मिश्रा यांच्याशी संपर्क साधला. न्यूजचेकरशी बोलतांना त्यांनी सांगितले की, हा व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे. तो पूर्णपणे काल्पनिक आहे. त्यात कुठलेही सत्य नाही. आम्ही असे अनेक व्हिडिओ बनवले आहेत. व्हिडिओत दिसणाऱ्या कलाकारांविषयी विचारल्यावर त्यांनी सांगितले की, हा व्हिडिओ सीतामढीमध्ये दिग्दर्शित केला होता. त्यात अमित आणि राणी यांनी काम केले होते.
या व्हिडिओच्या डिसक्लेमरबाबत विचारले असता त्यांनी सांगितले,”आम्ही आधीपासूनच असे व्हिडिओ बनवत आलो आहे. कधीच कोणत्या व्हिडिओबाबत कुठलीही चर्चा झाली किंवा कधी तशी परिस्थितीच उद्भवली नाही. पण हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला आणि त्याबाबत काही भ्रम पसरले.”
विक्रम मिश्रा कोण आहे ?
विक्रम मिश्रा हे सीतामढीमध्ये राहणारे एक कलाकार आणि दिग्दर्शक आहे. त्यांची बायको दिव्या मिश्रा देखील एक कलाकार आहे. विक्रम मैथिली भाषेतील कलाकारांसोबत विनोदी आणि सामाजिक मुद्द्यांशी निगडित व्हिडिओ बनवत असतात. विक्रम आणि त्यांच्या अन्य व्हिडिओ विक्रम मिश्रा, जय मिथिला, जय मिथिला म्युझिक, व्हॉईस ऑफ मिथिला, दिव्या विक्रम, मिथिला गेमर, आशिष मिश्रा, सिद्धार्थ झा, इत्यादी यु ट्यूब वाहिन्यांवर तुम्ही पाहू शकता..!
Conclusion
या पद्धतीने आमच्या तपासात हे स्पष्ट झाले की, मुलीच्या घरच्यांनी हुंड्याची मागणी पूर्ण न केल्यामुळे मुलाने लग्न तोडण्याची धमकी देण्याचा हा व्हिडिओ दिशाभूल करणारा आहे. खरंतर हा एक स्क्रिप्टेड व्हिडिओ असून त्याच्या माध्यमातून हुंड्यासारख्या प्रथेविरुद्ध एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
Result : False Context / False
Our Sources
फेसबुक व्हिडिओ – I Hate BJP JDU RJD In Bihar
फेसबुक पोस्ट – विक्रम मिश्रा
न्यूजचेकरने फोनवरून विक्रम मिश्रा यांच्याशी केलेला संवाद
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.