Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
सोशल मीडियात शिवसेनेने टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त संपूर्ण हिरव्या रंगाचे पोस्टर छापले असल्याचा दावा व्हायरल झाला आहे. यात म्हटले आहे की, शिवसेना आता टिपू सुलतानचा जयंतीही साजरा करणार आहे. यासंदर्भात लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी परिधान केलेल्या केसरी रंगाच्या शालीचा रंगही हिरवा दाखवण्यात आला आहे.
या पोस्टरवरुन शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे, शिवसेनेचे हिंदुत्व मतांसाठी हिरवे झाले असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे.
फेसबुकवर देखील हा दावा व्हायरल झाला आहे.
Crowdtangle वर या पोस्ट संदर्भात 27 Intrections आढळून आले आहेत.
शिवसेनेने टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त हिरव्या रंगाचे पोस्टर छापल होते का त्यात बाळासाहेब ठाकरेंचा शेला देखील हिरव्या रंगाचा दाखविण्यात आला होता का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी गुगल सर्चचा आधार घेतला असता India Today ची 21 जानेवारी 2021 रोजीची बातमी आढऑळून आली. यात म्हटले आहे की, महाराष्ट्रात टिपू सुलतानच्या पोस्टरवरून भाजप आणि माजी मित्रपक्ष शिवसेना यांच्यात शब्दयुद्ध सुरू आहे.
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की, हे पोस्टर सेनेची मते मिळविण्यासाठी किती असहायता आहे. हे दर्शवते. ते म्हणाले, “शिवसेनेने हिंदुत्वाचा त्याग केला होता, भगव्याचा त्याग केला होता आणि आता त्यांनी त्यांचे चिन्हही बदलले आहेत. त्यांना औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करणे अशक्य आहे, ते टिपू सुलतानची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहेत.”
बातमीत पुढे म्हटले आहे की, शिवसेनेने या आरोपांना निराधार ठरवत पलटवार करत दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले होते. पोस्टर लावणारे युवासेनेचे पदाधिकारी सलमान हाश्मी म्हणाले, “हे पोस्टर नोव्हेंबर 2020 मधील आहे. आम्ही प्रत्येक राष्ट्रीय सण जंयत्यांदरम्यान पोस्टर छापत असतो. पण हे विशिष्ट पोस्टर भाजपने एडिट करून हिरव्या रंगात बदलले आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आणि महाराष्ट्र सरकारला लक्ष्य करण्यासाठी हे जाणूनबुजून केले गेले. भाजपला आपल्या घाणेरड्या राजकारणाचा भाग म्हणून हे करण्याची सवय आहे.” यावर त्यांनी ओरिजनल पोस्टर देखील शेअर केल्याचा बातमीत उल्लेख आहे.
अधिक माहिती मिळविण्यासाठी आम्ही मीरा-भायंदरचे युवा सेना संघटक सलमान हाश्मी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “शिवसेनेच्या वतीने मागील वर्षी टिपू सुलतानच्या जयंती निमित्त पोस्टर छापण्यात आले होते. माऑत्र यात या भगव्या पोस्टमध्ये फक्त टिपू सुलतानचे चित्र हिरव्या रंगाचे होते. मात्र ते खोडसाळणपणे एडिट करुन संपुर्ण हिरव्या रंगाचे असल्याचे भासवून सोशल मीडियात व्हायरल करण्यात आले होते. आम्ही हा प्रकार माध्यमांच्याही लक्षात आणून दिला होता.जानेवारी मध्ये आम्ही यासंदर्भात नयानगर पोलीस चौकीत तक्रार दाखल केली होती. मात्र आता परत हिरव्या रंगाचे पोस्टर शेअर होत आहे, हा खोडसाळपणा दोन समुदाात तेढ निर्माण करण्यासाठी मुद्दा केला जात आहे.”
सलमान हाश्मी यांनी आमच्याशी मूळ पोस्टर देखील शेअर केले आहे. ते तुम्ही खाली पाहू शकता.
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, शिवसेनेने टिपू सुलतानचया जयंतीनिमित हिरव्या रंगाचे पोस्टर छापलेले नव्हते मूळ पोस्टरचा रंग खोडसालपणे बदलण्यात आला होता.
salman Hashmi
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad S Prabhu
June 10, 2025
Runjay Kumar
June 2, 2025
Prasad S Prabhu
May 21, 2025