Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact CheckFact Check: हिरव्या किंवा ढबू मिरचीत आढळतो जगातील सर्वात लहान विषारी साप?...

Fact Check: हिरव्या किंवा ढबू मिरचीत आढळतो जगातील सर्वात लहान विषारी साप? व्हायरल व्हिडीओचे सत्य इथे वाचा

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Claim
हिरव्या किंवा ढबू मिरचीत जगातील सर्वात लहान विषारी साप आढळत असून काळजी घ्या.
Fact
तज्ञांच्या मते व्हिडिओत दिसणारा साप नसून ती एकप्रकारची अळी किंवा कृमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा दावा अकारण दिशाभूल निर्माण करणारा आहे.

नागरिकांच्या आरोग्याची आणि जीवाची काळजी दाखविणारा एक मेसेज सध्या व्हाट्सअपच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे की, हिरव्या मिरचीत जगातील सर्वात लहान विषारी साप आढळून आला असून मिरची आहारात वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे.

Fact Check: हिरव्या किंवा ढबू मिरचीत आढळतो जगातील सर्वात लहान विषारी साप? व्हायरल व्हिडीओचे सत्य इथे वाचा

मेसेजमध्ये हिरवी मिरची असा उल्लेख असला तरी व्हिडिओमध्ये कापलेली ढबू (शिमला) मिरची दाखवताना दिसते. सदर व्हायरल व्हिडीओ पुढीलप्रमाणे आहे.

न्यूजचेकरला तथ्य तपासण्यासाठी आमच्या WhatsApp टिपलाइनवर (+91-9999499044) अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला आहे.

Fact Check: हिरव्या किंवा ढबू मिरचीत आढळतो जगातील सर्वात लहान विषारी साप? व्हायरल व्हिडीओचे सत्य इथे वाचा

Fact Check/ Verification

व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी आम्ही त्याच्या की फ्रेम्स काढून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला यासंदर्भात समान दावा करून शेयर केल्या जात असलेल्या २०१९ पासूनच्या पोस्ट मिळाल्या. त्या इथे आणि इथे पाहता येतील.

या दाव्यासंदर्भात आणखी शोधण्यासाठी आम्ही किवर्ड काढून शोध घेतला असता, Snopes ने २९ ऑगस्ट २०१९ रोजी प्रसिद्ध केलेले एक आर्टिकल सापडले. व्हायरल व्हिडिओबद्दल बोलताना, न्यू मेक्सिको विद्यापीठातील जीवशास्त्राचे वरिष्ठ व्याख्याता बेन हॅनेल्ट यांनी “हा बहुधा मर्मिटिड नेमाटोड आहे. हे मानवांसाठी रोगजनक नाहीत; फक्त कीटकांसाठी.” असे सांगितल्याचे आम्हाला वाचायला मिळाले.

Fact Check: हिरव्या किंवा ढबू मिरचीत आढळतो जगातील सर्वात लहान विषारी साप? व्हायरल व्हिडीओचे सत्य इथे वाचा
Screengrab of Snopes

व्हिडिओत दिसणारा जीव हा Worm अर्थात कृमी किंवा जंतासारखा प्रकार असल्याचे आम्हाला पाहायला मिळाले.

आम्ही यासंदर्भात प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. भूषण सुतार यांच्याशी संपर्क साधला असता, “मानवी शरीरात ज्याप्रमाणे कृमी होतात तशाच त्या फळे आणि भाजीतही होतात. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी ही कृमीच आहे. हा जीव साप नाही. शिवाय आजवरच्या सेवेत अशा कृमीने कुणाचा मृत्यू झाल्याचे ऐकिवात नाही किंवा नजरेस पडले नाही. अशा कृमींच्या स्पर्शाने किंवा चुकून झालेल्या सेवनाने मानवी जीवाला अपाय होत नाही. व्हायरल मेसेज मधील दावा खोटा आहे.” अशी माहिती त्यांनी दिली.

व्हायरल दाव्यातील जीव हा कृमी सदृश्य असल्याचे तज्ञांचे म्हणणे असल्यावरून आम्ही यासंदर्भात शोध घेतला. आम्हाला biomedcentral.com ने प्रसिद्ध केलेला एक लेख सापडला. यामधील माहिती आणि छायाचित्रे पाहता एका डासाच्या पोटातून बाहेर पडलेल्या कृमीचे तपशील आम्हाला मिळाले.

Fact Check: हिरव्या किंवा ढबू मिरचीत आढळतो जगातील सर्वात लहान विषारी साप? व्हायरल व्हिडीओचे सत्य इथे वाचा

साप या विषयाचे अभ्यासक आणि सर्पमित्र आनंद चिट्टी यांच्याशी आम्ही संपर्क साधला, “व्हायरल व्हिडिओत दिसणाऱ्या जीवाचा सापाशी काहीच संबंध नसून खोटा दावा केला जात आहे.” असे त्यांनी सांगितले. ” भारतातील सर्वात लहान साप वाळा किंवा Blindsnake म्हणून ओळखला जातो. दरम्यान या सापाशी आणि व्हिडिओतील दाव्याशी जवळचाही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.”

दरम्यान आम्ही भारतातील सर्वात लहान साप Blindsnake आणि जगातील सर्वात लहान साप Barbados threadsnake यांच्याबद्दल माहिती जमा केली. व्हायरल व्हिडिओत याप्रकारे दिसणारे साप आढळत नसल्याचे यावरून स्पष्ट झाले.

Fact Check: हिरव्या किंवा ढबू मिरचीत आढळतो जगातील सर्वात लहान विषारी साप? व्हायरल व्हिडीओचे सत्य इथे वाचा
Screengrab of animalia

यासंदर्भात आम्ही वनस्पतीशास्त्र आणि सर्पशास्त्राशी संबंधित तज्ञांशी संपर्क साधला असून त्यांची प्रतिक्रिया मिळताच हा लेख अपडेट केला जाईल.

Conclusion

आमच्या तपासात व्हायरल दाव्यात दिसणारा जीव साप नसल्याचे आणि तो कृमी सदृश्य जीव असल्याचे आणि त्याचा मानवी जीवनाला अपाय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हायरल दावा खोटा आणि अकारण भीती निर्माण करणारा आहे.

Result : False

Our Sources
Article published by Snopes on August 29, 2019
Article published by animalia.bio
Article published by britannica.com
Conversation With Dr. Bhushan Sutar
Conversation With Snake Expert Anand Chitti

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular