Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact Checkजवानांनी गलवान खो-यात गणेश विसर्जन केले नाही, चुकीचा दावा व्हायरल

जवानांनी गलवान खो-यात गणेश विसर्जन केले नाही, चुकीचा दावा व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

भारतीय सेनेच्या जवानांनी गलवान खो-यात गणेश विसर्जन केले असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात सेनेच्या जवानांनी गणेशमूर्तीचे विसर्जन मिरवणूक काढली असल्याचे दिसते. गलवान खो-यात भारत आणि चीन संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. यानंतर तिथे आता गणेशोत्सव साजरा केला जात असल्याचा दावा सोशल मीडियात केला जात आहे.

https://www.facebook.com/krishna.mvp/videos/3458239057559835

संग्रहित

Fact Check / Verification

भारतीय जवानांनी गलवान खो-यात खरंच गणेश विसर्जन केले आहे का याची पडताळणी करण्याचे व व्हायरल व्हिडिओचे सत्य जाणून घेण्याचे आम्ही ठरविले. याच दरम्यान आम्हाला फेसबुक देखील आणखी एक पोस्ट आढळून आली. ज्यात हाच दावा करण्यात आलेला आहे.

https://www.facebook.com/watch/?v=307069493714518&extid=AZNz6nClaZB56fVk

आमच्या पडताळणीत हा व्हिडिओ 2019 मध्ये मराठा लाईफ इन्फंट्रीच्या जवानांनी शिंगो नदीच्या खो-यात साजरा केलेल्या गणेशोत्सवाचा असल्याचे आढळून आले. रिव्हर्स इमेजच्या आधाराने व्हिडिओतील काही किफ्रेम्स वापरुन शोध घेतला असता यूट्यूबवर सप्टेंबर 2019 मध्ये जवानांनी साजरा केलेला गणेशोत्सवाचा व्हिडिओ आम्हाला आढळून आला.

आम्ही शिंगो नदीच्या खो-यात गणेशोत्सव साजरा केला आहे का याचा काही किवर्डसच्या आधारे शोध घेतला असाता आणखी एका फेसबुक यूजर ने आपल्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ 18 सप्टेंबर 2019 रोजी शेअर केला असल्याचे आढळून आले. यात मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी गणेशोत्सव साजरा केल्याचे दिसते.

https://www.facebook.com/watch/?v=2345922055456723&extid=8NzZ0eRMSukGMmVX

मीडिया रिपोर्ट्स नुसार मागील वर्षी गणेशोत्सव 2 ते 12 सप्टेंबर दरम्यान साजरा करण्यात आला होता. जवानांच्या गणेशोत्सवाचा व्हिडिओ 18 सप्टेंबर 2019 रोजीचा आहे. याचाच अर्थ एकाच आठवड्यात हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता.

याशिवाय व्हिडिओ बारकाईने पाहिला असता जवानांच्या पाठीमागे शिंगो रिव्हर व्हॅलीचा बोर्ड लावला असल्याचे आढळून आले.

त शिंगो नदी खोरे कारगिल जवळ असून गलवान खो-यापासून सुमारे 229 किलोमीटर अंतरावर आहे. शिंगो नदी सिंधू नदीची उपनदी आहे आणि पाकिस्तानमधील गिलगिट आणि कारगिलमधून वाहते, तर गलवान नदी विवादित अक्साई चिन भागातून वाहते आणि वास्तविक नियंत्रण रेषेत आणि लडाख भागात प्रवेश करते.

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, 2019 मध्ये शिंगो नदी खो-यात जवानांनी साजरा केलेल्या गणेशोत्सवाचा व्हिडिओ गलवान खो-यातील चीनसोबतच्या संघर्षानतरच्या 2020 च्या गणेशोत्सवाचा असल्याचा खोटा दावा सोशल मीडिया करण्यात येत आहे.

Result- Misleading

Sources

यूट्यूब- https://www.youtube.com/watch?v=SLgvPhj4cTU

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular