Thursday, December 26, 2024
Thursday, December 26, 2024

HomeFact Checkसोशल मीडियावर चालत्या रेल्वेवर दगडफेक करण्याचा व्हिडिओ भ्रामक दाव्यासोबत व्हायरल

सोशल मीडियावर चालत्या रेल्वेवर दगडफेक करण्याचा व्हिडिओ भ्रामक दाव्यासोबत व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केलाय की, मुस्लिम तरुणांनी रेल्वेवर दगडफेक केली.

देशात नुकत्याच धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या अनेक घटना घडत आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. न्यूजचेकरने यावर काही दिवसांपासून तथ्य पडताळणी केली आहे. ते वाचल्यावर तुम्हांला समजेल की, या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केलाय की, मुस्लिम तरुणांनी रेल्वेवर दगडफेक केली.

Fact Check/Verification

मुस्लिम तरुणांनी चालत्या रेल्वेवर दगडफेक केली, या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही त्याची एक की-फ्रेम गुगलवर टाकून शोधली. तेव्हा आम्हांला गुगलने काही फोटो दाखवले. मग त्यात आम्हांला ई-टीव्ही भारतची बातमी मिळाली. ही बातमी त्यांनी १३ एप्रिल २०२२ रोजी प्रकाशित केला होता.

गुगल सर्चचा स्क्रिनशॉट

त्या बातमीनुसार, चेन्नईतील पेरंबुर स्टेशन जवळील दोन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये भांडणे झाली आणि मग त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. पचईप्पा महाविद्यालय आणि प्रेसिडन्सी महाविद्यालय यांच्यात पूर्वीही अशा पद्धतीची भांडणे झाली आहे. 

ई-टीव्ही भारतच्या बातमीचा स्क्रिनशॉट

या घटनेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही काही कीवर्ड टाकून शोधले. त्यावेळी आम्हांला इंडिया टुडेने १२ एप्रिल २०२२ रोजी प्रकाशित केलेली एक बातमी मिळाली. त्या बातमीतही पचईप्पा महाविद्यालय आणि प्रेसिडन्सी महाविद्यालय यांच्यात झालेल्या भांडणाचा सांगितला आहे. पचईप्पा महाविद्यालय विद्यार्थी अरक्कोनमला जाणाऱ्या रेल्वेत जात होते तर प्रेसिडन्सी महाविद्यालयचे विद्यार्थी तिरुपती एक्सप्रेसने प्रवास करत होते. त्यानंतर प्रेसिडन्सी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रवाशांना तक्रार करत जबरदस्तीने रेल्वे थांबवली. मग त्यांनी अरक्कोनमला जाणाऱ्या रेल्वेत पचईप्पा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांवर दगडफेक केली.

इंडिया टुडेच्या बातमीचा स्क्रिनशॉट

यानंतर आम्ही पचईप्पा महाविद्यालय असं ट्विटरवर टाकून शोधले. या प्रक्रियेत आम्हांला स्थानिक लोकांनी १२ एप्रिल २०२२ रोजी व्हायरल व्हिडिओ पचईप्पा महाविद्यालय आणि प्रेसिडन्सी महाविद्यालय यांच्यात झालेल्या भांडणाचा म्हणून शेअर केलाय.

या व्यतिरिक्त आम्हांला सन न्यूज, दिनामलार आणि थांठी टीव्हीने प्रकाशित केलेल्या बातम्या सापडल्या. त्याही व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांमधील आपापसांतील भांडणाचा सांगितला आहे.

हे देखील वाचू शकता : डॉक्टर विकास आमटे यांनी कॅन्सर संबंधित कुठलाही मेसेज लिहिलेला नाही, खोटा दावा व्हायरल

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, मुस्लिम तरुणांनी रेल्वेवर दगडफेक केलेला दावा भ्रामक आहे. चेन्नईतील पचईप्पा महाविद्यालय आणि प्रेसिडन्सी महाविद्यालय यांच्यात झालेल्या भांडणाचा ती व्हिडिओ आहे.  

Result: False Context/Missing Context

Our Sources

ई-टीव्ही भारत, इंडिया टुडे, सन न्यूज, दिनामलार आणि थांठी टीव्ही यांनी प्रकाशित केलेल्या बातम्या

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular