Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
पेट्रोल, डिझेलच्या दरांविषयी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेला दावा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. स्वामींचे वक्तव्य माध्यमांत देखील प्रसिद्ध झाले. तसेच सोशल मीडियात देखल मोठ्या प्रमाणात त्यांचे वक्तव्य शेअर होत आहे. स्वामी यांनी रामाच्या भारतात पेट्रोल 93 रुपये तर रावणाच्या लंकेत 51 रुपये प्रतिलीटर मिळत आहे तर सीतेच्या नेपाळमध्ये 53 रुपये मिळते असे म्हटले आहे.
फेसबुकवर देखील ही पोस्ट खूप मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याच्या दाव्याचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही भारत सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर शोध घेतला. पडताळणीत आम्हाला आढळले की पेट्रोल आणि डिझेलवर शेती उपकर लादण्यात आला आहे. परंतु सरकारने उत्पादन शुल्क व विशेष उत्पादन शुल्क कमी केले आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी पेट्रोलच्या श्रीलंका नेपालमधील दरांबाबत केलेल्या दाव्यांची आम्ही पडताळणी सुरु ठेवली. भारतात सध्या पेट्रोलचा दर काय आहे हे तपासून पाहण्यासाठी My petrol price या संकेतस्थळाला भेट दिली. आम्हाला आढळले की दिल्लीतील पेट्रोलची किंमत 86.34 रुपये आहे, तर महाराष्ट्रातील पेट्रोलची किंमत 92.84 आहे.
नेपाळ ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या म्हणण्यानुसार,19 जानेवारीपर्यंत नेपाळमधील एक लीटर पेट्रोलची किंमत प्रति लिटर 108.50 रुपये होती. नेपाळमध्ये भारतीय चलनानुसार पेट्रोलचे प्रतिलिटर 67.95 रुपये आणि भारतात प्रतिलिटर 88.15 रुपये आहेत. तसेच आम्ही श्रीलंकेत पेट्रोलच्या किंमती किती आहेत याचा शोध घेतला. Global Petrol Prices.com या संकेतस्थळावर तपासणी दरम्यान आम्हाला आढळले आहे की श्रीलंकेत सध्याचा पेट्रोल दर भारतीय रुपयानुसार 61 रुपये प्रतिलिटर आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नेपाळ आणि श्रीलंकेतील पेट्रोल दरांबाबत चुकीचा दावा केला आहे.
My Petrol Price https://www.mypetrolprice.com/punjab/amritsar/ajnala/Petrol-price-in-nepal_142/37870?FuelType=0&CensusTVId=37870
Global Petrol Prices https://www.globalpetrolprices.com/Sri-Lanka/gasoline_prices/
Nepal Oil Corporation Limited https://noc.org.np/
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.