Authors
Claim
सूर्य थेट विषुववृत्तावर असल्याने २२ ते २८ मे दरम्यान निर्जलीकरण होते, कृपया पाणी जास्त प्या.
Fact
सूर्य विषुववृत्तावर येण्याची प्रक्रिया २२ ते २८ मे दरम्यान होत नाही. व्हायरल संदेशाला भूगोल शास्त्राचा कोणताही आधार नाही.
EQUINOX (जेथे सूर्य थेट पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या वर आहे) मुळे पुढील सात दिवस (22-28 मे) जास्त पाणी प्या. परिणामी, या काळात शरीरात जलद निर्जलीकरण होते. कृपया ही बातमी जास्तीत जास्त ग्रुपवर शेअर करा. धन्यवाद… असा मेसेज सध्या व्हाट्सअप च्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. उन्हाची तीव्रता वाढत आहे, उकाडा तीव्र झालाय, अशा वातावरणात सूर्य विषुववृत्तावर आला असल्याचा मेसेज अनेकांच्या भीतीमध्ये वाढ करीत आहे.
आम्हाला आमच्या Whatsapp टिपलाइनवर (9999499044) हा दावा प्राप्त झाला असून, त्याची तथ्य तपासणी करण्याची विनंती केली आहे.
Fact check
न्यूजचेकरने व्हायरल मेसेज काळजीपूर्वक वाचला. सूर्य थेट विषुववृत्ताच्या वर येणे या प्रक्रियेला व्हायरल मेसेजमध्ये EQUINOX हा इंग्रजी टर्म वापरण्यात आला असल्याचे आमच्या निदर्शनास आले. आम्ही किवर्ड सर्च च्या माध्यमातून याबद्दल शोध घेतला.
आम्हाला मराठी विश्वकोश ने २१ जून २०२१ रोजी प्रसिद्ध केलेला एक लेख आढळला.
यामध्ये EQUINOX अर्थात संपात चे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. वसंत संपात हा २० किंवा २१ मार्च रोजी होतो. तर शरद संपात २२ किंवा २३ सप्टेंबर रोजी होतो. अशी माहिती आम्हाला मिळाली. वर्षातून या दोनवेळा सूर्य विषुववृत्तावर येतो.या तारखांना दिवस आणि रात्रीचा कालावधी समान असतो. त्याच प्रक्रियेला मराठीत संपात म्हणतात आणि इंग्रजीत EQUINOX म्हणतात अशी माहिती आम्हाला मिळाली. यावरून २२ ते २८ मे दरम्यान EQUINOX किंवा संपात होतो हा व्हायरल मेसेज मधील दावा खोटा असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
आम्ही यासंदर्भात आणखी शोध घेतला असता, britannica.com ने याचविषयावर प्रसिद्ध केलेला लेख आम्हाला सापडला.
दरवर्षी मार्च २१ आणि सप्टेंबर २३ ला असा योग येत असल्याची माहिती आम्हाला मिळाली.
सूर्य EQUATOR अर्थात विषुववृत्ताच्या वर येतो अर्थात विषुववृत्त म्हणजे काय याची माहितीही आम्हाला marathiarticles.com वर पाहायला मिळाली. पृथ्वीच्या मध्यावरुन जाणार्या व पृथ्वीला उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध अशा दोन भागांमध्ये विभागणाऱ्या काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात. ही माहिती आमच्या वाचकांसाठी आम्ही खाली उपलब्ध करीत आहोत.
Conclusion
अशाप्रकारे आमच्या तपासात EQUINOX अर्थात संपात २२ ते २८ मे दरम्यान होत असल्याचा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे. उन्हाळा वाढत असल्याने शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी जास्त पाणी प्यावे ही शारिरीक गरज असून त्यासंदर्भात आम्ही कोणतीही टिप्पणी केलेली नाही.
Result: False
Our Sources
Article published by Marathi shabdakosh on June 21, 2021
Article published by Britannica.com
Article published by marathiarticles.com
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in