Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
शालेय पुस्तकांवर कर बसविणारा पहिला देश भारत ठरला आहे.
हा दावा खोटा आहे. शालेय पाठ्यपुस्तकांवर कोणताही कर नाही.
शालेय पुस्तकांवरही आता कर भरावा लागत आहे अशा संदर्भाने एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. असा कर लावणारा जगातील पहिला देश भारत ठरला आहे असे हा दावा सांगतो.
आम्हाला हा दावा X च्या बरोबरीनेच Facebook वरही आढळला.


या दाव्याच्या पडताळणीसाठी आम्ही संबंधित कीवर्डसच्या माध्यमातून भारत सरकारने पाठ्यपुस्तकांवर असा कर लावला आहे का? याचा शोध घेतला. मात्र आम्हाला अशी कोणतीही अधिकृत घोषणा किंवा माहिती देणारी बातमी मिळाली नाही.
पुढील शोधात आम्हाला २६ सप्टेंबर २०२० रोजी News Nation ने प्रसिद्ध केलेली बातमी आढळली. “जर तुम्ही कुठेतरी वाचले असेल किंवा ऐकले असेल की केंद्र सरकारने शालेय पाठ्यपुस्तकांवर कर लादला आहे, तर ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. सरकारने असे पाऊल उचललेले नाही.” अशी माहिती आम्हाला या बातमीत मिळाली.

२६ सप्टेंबर २०२० रोजीच पोलिसनामा ने दिलेल्या बातमीतही आम्हाला समान माहिती मिळाली. अशाप्रकारचा कोणताही निर्णय भारत सरकारने घेतलेला नसल्याचे निदर्शनास आले.

पुढील शोधात भारत सरकारची फॅक्ट चेक यंत्रणा PIB Fact Check ने या दाव्याचे खंडन करण्यासाठी २४ सप्टेंबर २०२० रोजी केलेले ट्विट आम्हाला सापडले.
अधिक माहितीसाठी आम्ही शालेय आणि इतर पुस्तकांची विक्री करणाऱ्या मुंबई येथील पार्ले बुक सेन्टरशी संपर्क साधला. “अशाप्रकारे कोणताही कर शालेय पाठ्यपुस्तकांवर लावण्यात आलेला नाही. हा दावा खोटा आहे.” अशी माहिती आम्हाला मिळाली.
अशाप्रकारे आमच्या तपासात शालेय पाठ्यपुस्तकांवर कर लावण्यात आल्याचा आणि अशाप्रकारची कृती करणारा भारत हा पहिला देश ठरल्याचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
Our Sources
Article published by News Nation on September 26, 2020
Article published by PoliceNama on September 26, 2020
X post shared by PIB Fact Check on September 24, 2020
Telephonic conversation with Parle Book Center, Mumbai
JP Tripathi
November 27, 2025
Salman
November 26, 2025
Kushel Madhusoodan
November 26, 2025