Friday, April 11, 2025

Fact Check

एक दाबल्यावर फोन हॅक करणाऱ्या कॉल बद्दलचा मेसेज आलाय? घाबरू नका, खोटा आहे तो मेसेज

Written By Prasad S Prabhu
Jan 13, 2023
banner_image

सध्या व्हाट्सअप वर एक इंग्रजी मेसेज जोरदार पसरत आहे. तुम्ही लसीकरण करून घेतले आहे का? असे विचारणारा एक संदेश येईल. कॉल येईल आणि आपण लसीकरण केले असल्यास १ दाबण्यास सांगितले जाईल आणि ते दाबल्यास फोन हँग होऊन हॅक होईल. आताच माझ्या मित्राचे असे झाले आहे. असे तो मेसेज सांगतो. लवकरात लवकर हा संदेश इतर ग्रुप्सवर टाका आणि इतरांनाही सावधान करा. असे सांगितले गेल्याने अनेकजण हा मेसेज पुढे पाठवत आहेत.

एक दाबल्यावर फोन हॅक करणाऱ्या कॉल बद्दलचा मेसेज
Screengrab of Whatsapp viral message

912250041117 या क्रमांकावरून कॉल येतो असे या मेसेज मध्ये म्हटलेले असते. त्यामुळे अनेकजण हा क्रमांक बोल्ड करून आपले मित्र आणि नातेवाईकांना मेसेज पाठवू लागले आहेत. कोणाचाही मोबाईल हॅक होऊ नये यादृष्टीने फॉर्वर्डस सुरु झाले आहेत.

Fact Check/ Verification

सर्वप्रथम आम्ही या मेसेज ची सत्यता पटविण्याचा प्रयत्न केला. या मेसेज मध्ये आपल्याला 912250041117 या क्रमांकावरून कॉल येतो असे सांगितले जात असल्याने आम्हीच या क्रमांकावर कॉल करून पाहिला असता हा १२ आकड्यांचा क्रमांक असून मोबाईल नंबर नसल्याचे आणि अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. आम्ही या क्रमांकासमोरील ९१ हा क्रमांक हटवून तेथे उपलब्ध असलेल्या सुरुवातीच्या २२ समोर ० अर्थात ०२२ असा एकत्रित मुंबईचा एसटीडी कोड लावून पाहिले. मात्र हा क्रमांक लँडलाईन नंबर म्हणूनही अस्तित्वात नसल्याचे आमच्या निदर्शनास आले. अस्तित्वातच नसलेल्या क्रमांकावरून एखाद्याला कॉल येणे अशक्य असते. नेहमी कॉल केला जाणारा क्रमांक काही काळासाठी बंद केला जातो. मात्र हा क्रमांक दूरध्वनी अथवा मोबाईल सेवा देणाऱ्या कोणत्याही कंपनीकडे अस्तित्वातच नसल्याची माहिती आम्हाला मिळाली. या क्रमांकाचा आणखी शोध घेतल्यावर आम्हाला एक ट्विट सापडले. यामध्ये आम्ही काढलेल्या निष्कर्षाला पुष्टी मिळाली.

दिल्ली पोलिसांनी २० मे २०२१ रोजी केलेल्या या ट्विट मध्ये असा मेसेज एक फसवणूक असून असा कोणताही नंबर अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट केले आहे. या अर्थाने २०२१ च्या दरम्यान हाच मेसेज दिल्ली आणि परिसरात व्हायरल झाल्याने दिल्ली पोलिसांना ट्विट करून या फसवणुकीबद्दल नागरिकांना माहिती द्यावी लागली होती. हे आमच्या लक्षात आले.

हा मेसेज आणि त्यातील क्रमांक संदर्भात शोध घेत असताना आम्हाला १३ जानेवारी २०२३ तेलंगणा टुडे ने प्रसिद्ध केलेली एक बातमी पाहायला मिळाली. फोन हॅक करणाऱ्या फोन कॉल बद्दलचा मेसेज म्हणजे एक फसवणूक असल्याचे तेलंगणा पोलिसांनी स्पष्ट केले असल्याचा मजकूर आम्हाला या बातमीत वाचायला मिळाला.

एक दाबल्यावर फोन हॅक करणाऱ्या कॉल बद्दलचा मेसेज
Screengrab of Telangana Today

“आम्ही तो नंबर तपासला. हा नंबर अस्तित्वात नाही. कुणालाही आजवर या क्रमांकावरून कॉल आला नाही. त्यामुळे घाबरण्याची गरजच नाही.” अशी प्रतिक्रिया तेलंगणा टुडे ला हैद्राबाद चे सायबर क्राईम विभागाचे एसीपी केव्हीएम प्रसाद यांनी दिली आहे. दरम्यान या बातमीवरूनच हा मेसेज दिल्ली नंतर तेलंगणा या राज्यातही पसरत असून तेथील पोलिसांनीही त्याची दखल घेतली असल्याचे आणि नागरिकांना काळजी करू नका असे आवाहन केल्याचे आमच्या निदर्शनास आले.

व्हायरल होणाऱ्या मेसेज मध्ये कोणते लसीकरण याचा स्पष्ट उल्लेख नसला तरीही लसीकरणाची माहिती विचारण्यासाठी कॉल येतो असा उल्लेख आहे. यामुळे लसीकरण फीडबॅक याबद्दल आम्ही आणखी शोध घेतला असता आम्हाला सरकारी अधिकृत माहिती नियमन करणाऱ्या पीआयबी फॅक्टचेकचे एक ट्विट सापडले.

पीआयबी फॅक्टचेकनेही या ट्विट मध्ये असा मेसेज फसवणुकीचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. कोरोना संदर्भातील लसीच्या चौकशीसाठी भारत सरकार ‘१९२१’ हा क्रमांक वापरते. याची नोंद घेण्याचे आवाहनही या ट्विटच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Conclusion

आमच्या तपासात व्हायरल मेसेज च्या माध्यमातून केला जात असलेला दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर क्रमांक अस्तित्वातच नाही. आजवर कोणत्याही व्यक्तीला त्यावरून कॉल आलेला नाही आणि कोरोना लसीच्या चौकशी व जागृतीसाठी भारत सरकारतर्फे वापरला जात असलेला क्रमांक वेगळाच आहे. हे आमच्या तपासात उघड झाले आहे.

Result: False

Our sources

News Published by Telangana Today

Tweet made by Delhi Police

Tweet made by PIB Factcheck


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
No related articles found
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,713

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.