Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
ख्रिसमस दिवशी प्रसिद्ध प्रवचनकार जया किशोरी यांनी सांताक्लाॅजचा वेश परिधान केल्याचा फोटो व्हायरल झाला असून त्यांच्यावर टिकेची झोड उठली आहे. व्हायरल पोस्टमध्ये जया किशोरी यांचे सांता क्लोजची टोपी घातलेले दोन फोटो शेअर होत असून यात म्हटले आहे की, “या प्रवचनकार जया किशोरी आहेत, ज्या ख्रिसमसला सातांक्लोजच्या गेटअपमध्ये सजल्या आहे. सनातन बंधुंनो आपण ज्यांना धर्मरक्षक किंवा धर्म प्रचारक समझता त्या प्रचवन विक्रेत्याशिवाय काही नाहीत. जी प्रवचनकार आपल्याला मंचावर बसून प्रवचन सांगते ती ख्रिसमसला सांताक्लाॅज बनते, तिच्याकडून काय आशा करणार? असा प्रश्न देखील या पोस्टमध्ये विचारण्यात आलेला आहे.
याशिवाय आमच्या एक वाचकाने जया किशोरी यांचा व्हायरल फोटो व्हाट्सअप वर शेअर करुन आम्हाला या फोटोची सत्यता पडताळण्याची विनंती केली.
Fact Checking/Verification
प्रवचनकार जया किशोरी यांनी खरंच ख्रिसमसला सांताक्लाॅजचा वेश परिधान केला होता का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. गूगलमध्ये काही किवर्डच्या साहाय्याने याबाबत शोध घेतला असता आम्हाला प्रवचनकार जया किशोरी यांनी सांताक्लाॅजचा वेश परिधान करुन ख्रिसमस साजरा केल्याची बातमी कुठेही आढळून आली नाही. यानंतर आम्ही जया किशोरी यांचे व्हायरल होत असलेले दोन्ही फोटो गूगल रिव्हर्सच्या माध्यमातून सर्च केले.
पहिला फोटो हा माॅर्फ केल्याचे आढळून आले. कारण 16 डिसेंबर रोजीचे जया किशोरींचे एक ट्विट आढळून आले, त्यामधील फोटो आणि व्हायरल फोटोतील पोज एकच असल्याचे दिसून आले शिवाय गळ्याजवळ लावेला माईक ही सारखाच आहे. आम्ही दोन्ही फोटोंची तुलना केली आहे यावरुन लक्षात येईल की मूळ ट्विटमधील फोटो माॅर्फ करण्यात आलेला आहे.
याशिवाय दुसरा फोटो देखील माॅर्फ केला असल्याचे आढळून आले. याविषयी अधिक शोध घेतला असता आम्हाला जनसत्ताच्या एका आर्टिकलमध्ये व्हायरल दुसरा फोटो आढळून आला जो माॅर्फ करुन सांताक्लाॅजचा वेश परिधान केल्याचे भासवण्यात आला आहे.
दोन्ही फोटोंची तुलना करुन पाहिल्यास लक्षात येते की, व्हायरल फोटो माॅर्फ करण्यात आलेला आहे.
Conclusion
यावरुन हेच स्पष्ट होते की, प्रवचनकार जया किशोरी यांचा फोटो माॅर्फ करण्यात आलेला आहे. त्यांनी सांताक्लाॅजचा वेश परिधान करुन ख्रिसमस साजरा केलेला नाही.
Result: Manipulated Media
Our Sources
Jansatta- https://www.jansatta.com/photos/picture-gallery/jaya-kishori-ji-wiki-bio-family-networth-income-fees-know-what-sadhvi-tell-about-life/1569097/6/
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.