Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या मुस्लीम धर्मीय मुलाला मारहाण केल्याची घटना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मधून उघडकीस आली आहे.तसेच या मुलाला मारहाणीमुळे झालेल्या जखमांचे फोटो देखील सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. मुलाला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक देखील केली आहे.
काय आहे नेमकी घटना
उत्तरप्रदेशातील गाझियाबाद मध्ये एका मुलगा पाणी पिण्यासाठी मंदिरात आला होता तेथे उभ्या असलेल्या युवकाने त्याला नावा विचारले तसेच आपल्या साथीदाराला व्हिडिओ बनविण्यास सांगितले त्या मुलाने आपले नाव आसिफ सांगताच त्याने मंदिरात तुझे काय काम आहे असा प्रश्न विचारताच त्याला मारहाण केली. याचा व्हिडिओ देखील इंस्टाग्रामवर अपलोड केला. मात्र काही सेकंदाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. मात्र यानंतरही सोशल मीडियात या मुलाला मारहाण झाल्याच्या दाव्याने काही फोटो शेअर होत आहेत. व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आसिफ चा केवढा मोठा गुन्हा ! तो देवळात जाऊन पाणी मागतो.म्हणून धर्मवेड्या व्यवस्थेने केवढं मारला आहे .थू तुमच्या धर्मावर. #खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे”
गाझियाबादमध्ये मुस्लिम मुलाला मारहाण झाल्याची बातमी खरी आहे पण व्हायरल होत असलेले फोटो त्या पीडित मुलाचेच आहेत का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध सुरु केला. अधिक शोध घेतला असता हा फोटो अरेबिक भाषेतील अनेक वेबसाईटवर हा फोटो असल्याचे आढळले. काही बातम्यांचा अनुवाद केला असता आम्हाला हा फोटो येमेन या देशातील असल्याची माहिती मिळाली. हा फोटो आॅक्टोबर 2020 मधील असल्याचे आढळून आले. येमेनमधील अल महावित शहरातील राशिद मोहम्मद अल-काहिली (वय 40) या व्यक्तीने त्याच्या स्वतःच्या चौदा वर्षीय मुलाला असे अमानुषपणे मारहाण केली होती.
एका सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीनुसार, 3 ऑक्टोबर 2020 रोजी राशिदने या मुलाला दोरीने बांधून जबर मारले. त्यांच्या संपुर्ण अंगावर जखमेचे व्रण उमटले. पोलिसांनी ही माहिती मिळाल्यानंतर राशिदला अटक करण्यात आली होती.
Khabaragency नावाच्या वेबसाईटवर देखील आम्हाला ही बातमी आढळून आली. ज्यात पित्याने आपल्या 14 वर्षीय मुलाला अमानुष मारहाण केल्याची माहिती देण्यात आली आहे. या बातमीचा आम्ही गूगल ट्रांसलेटच्या मदतीने केलेला अनुवाद आपण खाली पाहू शकता.
याशिवाय आम्हाला गाझियाबादमधील घटनेतील आरोपीवर कारवाई केल्याचे उत्तर प्रदेशातील पोलिसांचे ट्विट देखील आढळून आले. व्हिडिओतील मुलगा आणि फोटोतील मुलाचा ड्रेस वेगळा असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.
आमच्या पडताळणीतून हे स्पष्ट झाले की, गाझियाबादमध्ये मुस्लिम मुलाला मारहाण झाल्याची घटना खरी आहे मात्र सोशल मीडियात व्हायरल होत असलेले फोटो मात्र येमेन मधील आहेत.
UP Police- https://twitter.com/ghaziabadpolice/status/1370452154348052480
khabaragency- https://www.khabaragency.info/news133356.html
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad S Prabhu
April 25, 2025
Prasad S Prabhu
April 17, 2025
Tanujit Das
April 16, 2025