Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
दावा – व्हायरल व्हिडिओ निसर्ग चक्रीवादळाच्या अलिबाग मधील केंद्रबिंदूचा आहे
समुद्रात घोंघावणा-या आणि जमिनीकडे झेपावणा-या वादळाची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. हा व्हिडिओ निसर्ग चक्रीवादळाच्या अलिबागमधील केंद्रबिंदूचा असल्याचा दावा करण्यात येत आहे.
पडताळणी- आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली असता फेसबुक आणि ट्विटरवर याच दाव्याने हा व्हिडिओ शेअर होत असल्याचे आढळून आले.
याशिवाय टिव्ही 9 मराठीच्या बातमीमध्ये देखील निसर्ग चक्रीवादळाचा व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे.
यानंतर आम्ही शोध सुरुच ठेवला असता आम्हाला महाराष्ट्र टाईम्सची बातमी मिळाली ज्यात अलिबागमध्ये निर्सग चक्रीवादळाच्या तडाख्याची माहिती दिली होती पण यात शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत व्हायरल व्हिडिओशी मिळती जुळती दृश्ये नव्हती. आम्ही गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने याबाबत शोध घेतला असता फेसबुक वर मागील वर्षीच्या एका पोस्टमध्ये हा व्हिडिओ आढळून आला. यात हा व्हिडिओ क्यार चक्रीवादळाचा असल्याचे म्हटले आहे.
यावरुन हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा याबाबत उत्सुकता वाढली, त्यामुळे आम्ही याबाबत अधिक शोध घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला यूट्यूबवर 25 आॅक्टोबर 2019 रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडिओ आढळून आला.
याशिवाय आम्हाला हा व्हिडिओ सुवर्णा न्यूज या कन्नड वृत्तवाहिनीच्या यूट्यूब चॅनेलवर दिसून आला. यात म्हटले आहे की कर्नाटकच्या किनारपट्टीवर क्यार चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ हा अलिबागमधील चक्रीवादळाचा नसून मागील वर्षी कर्नाटकात आलेल्या क्यार चक्रीवादळाचा आहे. माध्यमांत आणि सोशल मीडियात हा व्हिडिओ चुकीच्या दाव्याने शेअर करण्यात आला आहे.
Source
Facebook Twitter Google Reverse Image,YouTube
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.