Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
बॅंकेत पैसै जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी शुल्क द्यावे लागणार आहे. बॅंक आॅफ बडोदा ने याची सुरुवात देखील केली आहे हा नियम 1 नोव्हेंबर 2020 पासून लागू होणार असल्याचा दावा केला जात आहे.
याशिवाय टिव्ही 9 मराठी ने देखील याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार 1 नोव्हेंबरपासून ग्राहक कर्ज खात्यातून महिन्यात तीन वेळा पैसे काढू शकतील. त्याहून जास्त वेळा व्यवहार केल्यास दीडशे रुपये द्यावे लागणार आहेत, बचत खात्याविषयी बोलायचे झाल्यास अशा खातेदारांना तीन वेळा पैसे जमा करणे विनामूल्य असेल, परंतु जर ग्राहक चौथ्यांदा पैसे जमा करत असतील तर त्यांना 40 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी जन धन खातेदारांना यातून थोडा दिलासा मिळाला आहे, त्यांना जमा करण्यात येणाऱ्या रकमेवर कोणतीही फी भरावी लागणार नाही, परंतु पैसे काढताना 100 रुपये द्यावे लागतील.
वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्समध्ये बॅंका पैसे जमा करणे व काढणे यावर शुल्क आकारणार असल्याचा दावा केला जात आहे मात्र हा दावा कितपत खरा आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. बँकांनी शुल्कात बदल केल्याची माहिती आरबीआयने दिली आहे का याचा शोध घेण्यासाठी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट दिली तसेच, ट्विटरवर देखील शोध घेतला पण आरबीआयकडून जारी केलेली अशा प्रकारची कोणतीही सुचना आढळून आली नाही.
बॅंका आॅफ बडोदा ने शुल्क वसुली सुरु केली असल्याचा दावा पोस्टमध्ये असल्याने बॅंक आॅफ बडोदा ने खरंच शुल्क वाढ केली आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी बॅंकेच्या वेबसाईटला भेट दिली. पण अशी कोणतीही माहिती आढळली नाही.
बँक ऑफ बडोदाने 1 जुलै 2020 रोजी शुल्कात बदल केला आहे. मात्र पोस्टमध्ये नमूद केलेल्या शुल्काचा उल्लेख नाही. आपण खाली पाहू शकता.
याशिवाय आम्हाला पीआयबी फॅक्ट चेकचे ट्वीट आढळून आले आहे ज्यात बॅंक आॅफ बडोदाने अशा प्रकारे शु्ल्क आकारले नसल्याचे म्हटले आहे.
याशिवाय आणखी एक ट्विट आढळून आले ज्यात जनधन खात्याविषयी तसेच बॅंकांच्या निर्णयाविषयी माहिती देण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, शुल्कवाढीचा कोणताही निर्णय़ घेण्यात आलेला नाही.
यावरुन हेच सिद्ध होते की, सरकारी क्षेत्रातील बॅंकांनी 1 नोव्हेंबरपासून पैसे काढणे व जमा करणेसाठी शुल्कआकारणी सुरु केलेली नाही. खोटा दावा व्हायरल झाला आहे.
PIB- https://twitter.com/PIBFactCheck/status/1322074635446353920