Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
दावा– शेडसोबत हवेत उडालेल्या व्यक्तीचे सीसीटीवी फुटेज निर्सग वादळादरम्यानचे आहे.
सोशल मीडियात एक व्हिडिओ व्हायररल होत आहे. यात शेडला पकडून उभा असलेला व्यक्ती जोरदार वा-यामुळे शेडसोबत वरती खेचला जातो.मात्र तो कसाबसा आपला जीव वाचवून खाली उतरतो. हा सर्व प्रकार एका सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झालेला आहे. हे सीसीटीव्ही फुटेज निर्सग वादळा दरम्यानचे असल्याचा दावा करण्यात येत आहे.
पडताळणी- मागील दोन दिवसांपासून कोकण किनारपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि नगर आणि नाशिक जिल्ह्यात निसर्ग वादळाने थैमान घातल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने आम्ही या व्हायरल सीसीटीवी फुटेज नेमके कुठले आणि कधीचे आहे याची पडताळणी सुरु केली.पडताळणी दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे आढळून आले. फेसबुकवर अनेक युजर्सनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
ट्विटरवर देखील हा व्हिडिओ आढळून आला.
आम्ही काही किवर्डसच्या मदतीने या व्हायरल व्हिडिओ संदर्भात शोध घेतला असता पण निर्सग वादळा दरम्यान शेडसोबत हवेत उडालेल्या व्यक्तीची कुठेेही बातमी आढळून आली नाही. यानंतर आम्ही व्हायरल सीसीटीवी फुटेज बारकाईने पाहिले असता ते दोन वर्षापूर्वीचे 1 जून 2018 रोजीचे असल्याचे आढळून आले.
काही किवर्डसच्या मदतीने अधिक शोध घेतला असता News flare या वेबसाईटवर हा व्हिडिओ आढळून आला. यात दिलेल्या माहितीनुसार हे सीसीटिव्ही फुटेज 2018 मध्ये हरियाणातील हिसार येथे आलेल्या वादळामधील आहे.
यावरुन हेच स्पष्ट होतेे की शेडसोबत हवेत उडालेल्या व्यक्तीचा व्हिडिओ हा निसर्ग चक्रीवादळादरम्यानचा नसून दोन वर्षापूर्वीचा आहे. सोशल मीडियात चुकीच्या दाव्याने व्हायरल होत आहे.
Source
Facebook, Twitter, Google Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.