Thursday, April 25, 2024
Thursday, April 25, 2024

HomeFact Checkटोल नाक्यावर मिळणाऱ्या त्या पावतीचा मेसेज भ्रामक आहे, जाणून घ्या सत्य काय...

टोल नाक्यावर मिळणाऱ्या त्या पावतीचा मेसेज भ्रामक आहे, जाणून घ्या सत्य काय आहे? 

सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केलाय की, टोल नाक्यावर मिळणाऱ्या पावतीचे अतिरिक्त फायदे आहेत. 

व्हायरल होणारा मेसेज : 

“टोल नाक्यावर मिळणाऱ्या या पावती मध्ये दडलंय काय? आणि ती का जपून ठेवली पाहिजे? त्याचे अतिरिक्त फायदे काय आहेत?” हे आज जाणून घेऊयात.

१. टोल भरलेल्या रस्त्यावरून जातांना जर का तुमची गाडी अचानक बंद पडली तर तुमच्या गाडीला ‘टो-अवे’ करून घेऊन जाण्याची जबाबदारी टोल घेणाऱ्या कंपनीची असते.

२. एक्सप्रेस हायवे वर जर का तुमच्या गाडीतील पेट्रोल संपलं किंवा बॅटरी डिस्चार्ज झाली तर तुम्हाला अश्या वेळी तुमच्या गाडीच्या जागेवर येऊन पेट्रोल, एक्सटर्नल चार्जिंग देण्याची जबाबदारी टोल घेणाऱ्या कंपनीची असते.पण, झालंच तर गाडी पूर्णपणे डाव्या साईड ला लावावी आणि टोल पावतीवर दिलेल्या फोन नंबर वर एक फोन करावा.दहा मिनिटात तुम्हाला मदत मिळेल आणि ५ ते १० लिटर पेट्रोल हे मोफत मिळेल. गाडी पंक्चर झाल्यास सुद्धा तुम्ही या नंबर वर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

३. तुमच्या गाडीचा अपघात जरी झाला तरी तुम्ही किंवा तुमच्यासोबत असलेल्या कोणीही आधी हे टोल पावतीवर दिलेल्या फोन नंबर वर संपर्क साधणं आवश्यक आहे.

४. तुम्ही गाडीतून प्रवास करतांना जर का एखाद्या व्यक्तीची तब्येत अचानक बिघडली आणि त्या व्यक्तीला जर तातडीने दवाखान्यात नेणं आवश्यक होऊ शकतं. अश्या वेळेस अँम्ब्युलन्स तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही जबाबदारी टोल कंपन्यांची असते.

ज्यांना ही माहिती नव्याने कळली असेल त्यांनी ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी. एक्सप्रेसवे मुळे वेळेची होणारी बचत हा त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणावा लागेल.

फेसबुकवर व्हायरल झालेल्या या मेसेजचा स्क्रिनशॉट खाली जोडत आहे.

त्यातच आता टोल नाक्यावर मिळणाऱ्या पावतीचा मेसेज व्हायरल होत आहे.

Fact Check / Verification

टोल नाक्यावर मिळणाऱ्या त्या पावतीच्या व्हायरल मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही गुगलवर त्या संदर्भातील माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. पण आम्हांला तिथे काही माहिती मिळाली नाही. मग आम्ही नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) या अधिकृत संकेतस्थळावर गेलो. 

एनएचएआयशी आम्ही संपर्क साधला. तेव्हा त्यांनी अधिकृतपणे सांगितले की, ही सर्व माहिती भ्रामक आहे. 

नॅशनल हायवेचा हेल्पलाईन नंबर १०३३ आणि १०८ आहे. 

Conclusion

अशा पद्धतीने टोल नाक्यावर मिळणाऱ्या त्या पावतीचा व्हायरल होणारा मेसेज भ्रामक आहे. 

Result : Fabricated Context / False

Our Sources 


फोनवरून न्यूजचेकरने एनएचएआयच्या अधिकाऱ्याशी अधिकृतपणे साधलेला संवाद 

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular