या सप्ताहात Newschecker ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. अहमदनगरच्या बाबाभाई पठाण यांनी हिंदू मुलींना दत्तक घेउन त्यांचे लग्न हिंदू पद्धतीने लावल्याचा दावा आणि इतरही दावे या आठवड्याता मोठया प्रमाणात व्हायरल झाले. हे सगळे दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. इथे वाचा या सप्ताहातील टाॅप-5 फेक न्यूज :

मुस्लिम व्यक्तीने हिंदू मुलींना दत्तक घेतल्याचा दावा व्हायरल
अहमदनगरमधील बाबाभाई पठाण यांनी हिंदू मुलींना दत्तक घेऊन त्यांचे लग्न लावून दिले आहे असा दावा व्हायरल झाला असून पण सत्य वेगळेच आहे. बाबाभाई पठाण यांनी हिंदू मुलींचा मामा म्हणून कर्तव्य पार पाडले आहे. या मुली अनाथ नसून त्यांचे आईवडील जिवंत असून वडिल त्यांच्याजवळ राहत नाहीत. सोशल मीडियात चुकीचा दावा व्हायरल झाला आहे.

दुधात भेसळ करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ मुंबईतील आहे?
एक व्यक्ती दुधात घाण पाणी ओतत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ मुंबईतील जोगेश्वरी येथील तबेल्यातील असल्याचा दावा करण्यात आला. आमच्या पडताळणीत हा व्हिडिओ हैद्राबादमधील असल्याचे आढळले.

आमीर खानने दहशतवाद्यांची भेट घेतली होती का?
बाॅलीवुड अभिनेता आमीर खानने नुकतीच दहशतवादी तारिक जमील आणि जुनैद शमशेद यांची भेट घेतली असल्याचा दावा व्हायरल झाला. आमीर खानचे जुने फोटो आत्ताचे म्हणून चुकीच्या दाव्याने व्हायरल करण्यात आले आहेत. शिवाय फोटोतील व्यक्ती या दहशतवादी नसून गायक व धर्म उपदेशक आहेत.

लोणावळ्यात लाॅकडाऊनमध्ये भुशी डॅमवर लोकांनी गर्दी केली?
सोशल मीडियात भुशी डॅमचा व्हिडिओ असल्याचा दावा व्हायरल झाला आहे. भुशी डॅमवर रविवारी गर्दी झाली होती. भारत कधीच कोरोनाला रोखू शकत नाही. पडताळणीत हे सिद्ध झाले की, व्हायरल व्हिडिओ हा लोणावळ्यातील भुशी डॅमचा नसून राजस्थानमधील गोवटा तलावाचा आहे.

प्रविण तरडेंना गणपती आणि संविधान प्रकरणावरुन मारहाण झाली?
एबीपी माझाच्या बातमीची 19 सेकंदांची क्लिप व्हायरल झाली असून यात मुळशी पॅटर्नचे दिग्दर्शक अभिनेते प्रविण तरडे यांना कार्यालयात घुसून अज्ञात लोकांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. तरडे हे नुकतेच संविधानाच्या पुस्तकावर गणपतीची स्थापना केल्यामुळे वादात अडकले होते. पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे सत्य समोर आले.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.