Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
या सप्ताहात Newschecker ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. चीनमध्ये तीन धरणे फूटून प्रचंड नुकसान झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानांतर निययतीने चीनला धडा शिकवल्याचा दावा सोशल मीडियात करण्यात आला. इतरही दावे या आठवड्याता मोठया प्रमाणात व्हायरल झाले. हे सगळे दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. इथे वाचा या सप्ताहातील टाॅप-5 फेक न्यूज :

चीनमध्ये तीन धरणे फुटून महापूर आल्याने प्रचंड नुकसान झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून लोकांनी सोशल मीडियात चीनला नियतीने धडा शिकविला अशी टिप्पणी केली. मात्र हा व्हिडिओ चीनमधील नसून 9 वर्षांपूर्वी 2011 मध्ये जपानमध्ये आलेल्या त्सुनामीचा आहे. सोशल मीडियात हा व्हिडिओ चीनच्या नावाने व्हायरल होत आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

चीन नंतर झालेल्या संघर्षानंतर आॅगस्ट 2020 च्या गणेशोत्सवा दरम्यान भारतीय सेनेच्या जवानांनी गलवान खो-यात देखील गणेश विसर्जनाची जंगी मिरवणूक काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पडताळणीत हा व्हिडिओ मागील वर्षी मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांनी शिंंगो नदीच्या खो-यात साजरा केलेल्या गणेशोत्सवाचा असल्याचे आढळून आले. संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा

पुण्यातील रमांकांत जोशी यांचे कोरोनोनाने निधन झाले. तबलगी जमातच्या लोकांनी त्यांच्या अंत्ययात्रेस खांदा दिला असा दावा व्हायरल होत आहे. पडताळणीत मुस्लिमांनी हिंदू व्यक्तीची अंत्ययात्रा काढली हे खरे असल्याचे आढळले मात्र हा प्रसंग पुण्यातील नसून उत्तरप्रदेशमधील मेरठ येथील रमेश माथुर या पुजा-याच्या अंत्ययात्रेचा असल्याचे स्पष्ट झाले. संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा

जर सर्व लोकांनी एका आठवड्यासाठी स्टीम ड्राइव्ह मोहिम सुरू केली तर करोना संपू शकतो, असा दावा केला जात आहे. मात्र पडताळणीत हा दावा असत्य असल्याचे आढळून आले आहे. IMA च्या डाॅक्टरांच्या म्हणण्यानुसार शरीरांतर्गत पसरलेल्या कोरोना विषाणूवर गरम वाफेचा परिणाम होत नाही. मात्र शरीराबाहेर उकळत्या पाण्यात कोरोना नष्ट होतो.याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यात एका बसजवळ एक व्यक्ती खाली बसला असून पोलिसांनी त्याला गराडा घातला आहे. दावा केला जात आहे कर्नाटकमधील हुबळी शहरात पोलिसांनी एका दहशतवाद्याला पकडले आहे. पडताळणीत हे माॅकड्रिल असल्याचे आढळून आले. पोलिस किती तत्परतेने मदत करतात हा संदेश देण्याचे हे माॅक ड्रिल करण्यात आले. संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.