मुंबई पोलिसांनी +140 क्रमांकाबद्दल सतर्क राहण्याचा संदेश दिला असून हा क्रमांक असलेल्या मोबाइल नंबरवरुन तुम्हाला जर काॅल आला तर तो तुम्ही घेऊ नका, नाहीतर तुमचे बॅंक अकाउंट रिकामे होईल. असा संदेश देणारा एक मॅसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.


पडताळणी
मुंबई पोलिसांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या या मॅसेजचे नेमके सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. गूगलमध्ये काही किवर्ड्सच्या मदतीने शोध शुरु केला असता. यूट्यूबवर एक व्हिडिओ आढळून आला. यात एक पोलिस कर्मचारी पेट्रोलिंग कार मधून लोकांना +140 क्रमांकाबद्दल सतर्क राहण्याची अनाऊसमेंट करत असल्याचे दिसत आहे. यात तो कर्मचारी म्हणत आहे की, कांजूर रहिवाशांना कळविण्यात येते की, त्यांना विनंती आहे, आपल्या मोबाईल नंबरवर 140 वरुन काॅल येत असेल तर उचलू नका, उचललात तर आपल्या बॅंकेमध्ये 0 टक्के बॅलंस होऊन जाईल. याची काळजी घ्या. यानंतर दुस-या परिसरात देखील अशाच प्रकारची अनाउसमेंट पोलिस करत असल्याची क्लिप या व्हिडिओत आहे.
मुंबई पोलिसांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी मुंबई पोलिस आणि सायबर विभागाकडे याबाबत विचारणा केली आहे.

यावर सायबर पोलिसांनी ट्विट करुन माहिती दिली आहे हा टेलिमार्केटिंगचे नंबर आहेत यावर आपली कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करु नका.
मग पोलिस असा संदेश का देत आहेत याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला सायबर विभागाचे एक ट्विट आढळून आले. ज्यात म्हटले आहे की एका टिव्ही चॅनलने प्रमोशनसाठी हा पोलिसांच्या नावाने हा व्हिडिओ तयार केला होता. पोलिसांनी या वाहिनीला हा प्रमोशनल व्हिडिओ थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
लोकांनी टिव्ही चॅनलला याबाबत जाब विचारण्यास सुरुवात केल्यानंतर चॅनलने ट्विट करुन दिलगिरी व्यक्त केली आहे. नवा शो साठी हे प्रमोशन केले होते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा उद्देश नव्हता असे चॅनलचे म्हणणे आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की मुंबई पोलिसांच्या नावाने व्हायरल होत असलेल्या संदेश व व्हिडिओ हा खरा नसून, एका टिव्ही चॅनलने आपल्या शो च्या प्रमोशनसाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आला होता. लोकांत संभ्रम निर्माण केल्यामुळे पोलिसांनी हा व्हिडिओ थांबवण्याचे आदेश संबंधित टिव्ही चॅनलला दिले आहे.
Source
- Youtube
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)