सोशल मीडियात सध्या एक संदेश सामायिक केला जात आहे, असा दावा करण्यात आला आहे की अमेरिकेतील जो बायडन प्रशासनाने Generalized System of Preferences (GSP) कार्यक्रमांतर्गत लाभार्थी विकसनशील देशांच्या यादीत भारताचा देखील समावेश केला आहे.
GSP हा अमेरिकेचा सर्वात मोठा व सर्वात जुना व्यापार प्राधान्यक्रम कार्यक्रम आहे आणि यात समाविष्ट केलेल्या लाभार्थी देशांतील हजारो उत्पादनांना शुल्कमुक्त प्रवेश देऊन आर्थिक विकासास प्रोत्साहन देण्यासाठी या ही कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. जून 2019 मध्ये तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जीएसपी यादीतून भारताला वगळले होते.


हा दावा फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Fact Check/Verification
सर्वप्रथम आम्ही व्हायरल होत असलेल्या दाव्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्हाला कुठेही अमेरिकेने भारताला जीएसपी यादीत स्थान दिल्याची बातमी आढळून आली नाही. त्यानंतर आम्ही यूएस व्यापार प्रतिनिधीची वेबसाइटला भेट दिली मात्र यात कुठेही भारताला स्थान दिल्याची माहिती आढळून आली नाही.

1 मार्च 2021 रोजी अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधीने अध्यक्ष जो बायडन यांचा 2021 चा ट्रेड एजेंडा आणि 2020 वार्षिक अहवाल जाहीर केला. त्या अहवालातही, जीएसपी यादीमध्ये भारताच्या उल्लेख नव्हता.

Result: False
Our Sources
US Government- https://ustr.gov/
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.