Authors
Claim
निवडणुकीत पक्षाच्या विजयानंतर काँग्रेसचे कर्नाटक अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सावरकरांचे संदर्भ असलेली पाने फाडली.
Fact
हा व्हिडिओ 2022 मध्ये आयोजित भाजपच्या पाठ्यपुस्तकांच्या सुधारणा धोरणविरोधी आंदोलनातील आहे.
कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 224 पैकी 135 जागा जिंकल्याच्या काही दिवसांनंतर, काँग्रेसचे कर्नाटक अध्यक्ष डी के शिवकुमार हे राज्यातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये व्ही डी सावरकर यांच्याशी संबंधित पाने फाडताना दिसत असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Fact check
00.29-सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओची सुरुवात डी के शिवकुमार यांच्या बोलण्याने होते, “बसवराज बोम्मई [कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री] यांनी कन्नड पुस्तकांचे काय केले ते पहा” असे पाने फाडण्याआधी ते बोलताना दिसतात. त्यांनी सावरकरांबद्दल काहीही बोलल्याचे ऐकायला येत नाही. यामुळे हा प्रकार काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला.
त्यानंतर न्यूजचेकरने “शिवकुमार पाठ्यपुस्तके फाडत आहेत” असा कीवर्ड शोध घेतला, ज्यामुळे आम्हाला 18 जून 2022 रोजी इकॉनॉमिक टाइम्सने अपलोड केलेल्या या Youtube व्हिडिओकडे नेले, ज्याचे शीर्षक आहे, “Karnataka textbook row: DK Shivakumar tears the copy of a revised textbook as a protest.”
बातमीत एक व्हिडिओ आहे जो व्हायरल व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे समान घटना दर्शवितो, परंतु वेगळ्या कोनातून. वर्णनानुसार, “KPCC प्रमुख DK शिवकुमार यांनी कर्नाटकातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये मजकूर जोडल्याचा आणि हटवल्याचा निषेध म्हणून सुधारित पाठ्यपुस्तकाची प्रत फाडून टाकली.”
18 जून 2022 रोजीच्या टाइम्स नाऊच्या रिपोर्टमध्ये , “मिरर नाऊवरील ताज्या बातम्यांनुसार, केपीसीसी प्रमुख डीके शिवकुमार यांनी सुधारित पाठ्यपुस्तकांची प्रत फाडली. राज्य सरकारने पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्याची घोषणा केल्यानंतर निदर्शने सुरू झाली…” असे म्हटलेले आहे.
संबंधित कीवर्ड शोधामुळे आम्हाला सुधारित पाठ्यपुस्तकांच्या विरोधात कर्नाटक काँग्रेसच्या निषेधाचे अनेक रिपोर्ट सापडले, जे येथे, येथे आणि येथे पाहिले जाऊ शकतात. आम्हाला कळले की विरोधी पक्ष, लेखक आणि जाणकार यांनी भाजप सरकारवर शालेय पाठ्यपुस्तकांचे भगवेकरण केल्याचा आणि बसवण्णा आणि डॉ बी आर आंबेडकर सारख्या प्रमुख समाजसुधारकांना नवीन पुस्तकांमध्ये कमी प्रकाशात टाकल्याचा आरोप केला होता.
“शिवकुमार यांनी नवीन पाठ्यपुस्तकाची एक प्रत फाडली आणि म्हटले की सरकारने सुधारित पाठ्यपुस्तक मागे घ्यावे अन्यथा ते फाडावे लागेल,” 19 जून 2022 रोजीचा इंडियन एक्सप्रेसचा रिपोर्ट सांगतो.
पाठ्यपुस्तकांचा नेमका वाद काय आहे?
भाजपच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारने 2020 मध्ये पाठ्यपुस्तक सुधारणा समितीची स्थापना केली, समितीने 2022 मध्ये इयत्ता 6 वी ते 10 वी मधील सामाजिक विज्ञान पाठ्यपुस्तके आणि इयत्ता 1 ते 10 मधील कन्नड भाषेची पाठ्यपुस्तके सुधारित केली. म्हैसूरचे शासक टिपू सुलतान, लिंगायत समाजसुधारक बसवन्ना, द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार, सुधारक नारायण गुरु आणि स्वामी विवेकानंद यांना अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आले किंवा त्यांचे महत्व कमी करण्यात आले. तथापि, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्या भाषणाने सुधारित इयत्ता 10 कन्नड पाठ्यपुस्तकात प्रवेश केला,” असे इंडिया टुडेच्या रिपोर्टमध्ये म्हटलेले आहे. त्यानंतर राज्य सरकारने सुधारित पाठ्यपुस्तके मागे घेणार नसल्याचे सांगितले, परंतु पुनरावृत्ती करताना सात ते आठ चुका झाल्या असून, त्या सुधारून शाळांना पाठवण्यात येतील. अशी प्रतिक्रिया दिली होती.
Conclusion
भाजपच्या शिक्षणाच्या कथित “भगव्याकरण” च्या निषेधार्थ 2022 मध्ये काँग्रेसचे कर्नाटक अध्यक्ष डी के शिवकुमार स्टेजवर पाठ्यपुस्तक फाडतानाचा व्हिडिओ निवडणुकीनंतरच्या संदर्भाने व्हायरल करण्यात आल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
Result: False
Sources
Economic Times report, Youtube, June 18, 2022
Indian Express report, June 19, 2022
India Today report, June 9, 2022
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in