Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
हिंदू महिलेवर मुस्लिम पतीने केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ.
Fact
घरगुती वादाच्या या व्हिडिओमध्ये कोणताही संप्रदायिक अँगल नाही.
सोशल मीडियावर एक महिलेवरील हल्ल्याचा अस्वस्थ करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक पुरुष लहान मुलाच्या उपस्थितीत महिलेवर अत्याचार करताना दिसत आहे. हिंदू महिलेला शिवीगाळ करणारी व्यक्ती हा तिचा मुस्लिम नवरा आहे, जो तिला हिंदू विधीनुसार दिवा लावण्यासाठी मारहाण करत असल्याचा दावा या व्हिडिओसह केला जात आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती महिला आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. यादरम्यान एक पुरुष खोलीत येतो आणि महिलेला मारहाण करू लागतो. नंतर व्हिडिओमध्ये बालकही महिलेला मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
व्हायरल पोस्टमध्ये हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये हिंदीमध्ये लिहिले आहे की, ”बेंगलुरु में एक हिंदू लड़की ने आईटी प्रोफेशनल मोहम्मद मुश्ताक से शादी कर ली। अपने बच्चे के जन्मदिन पर उन्होंने हिंदू रीति रिवाज के मुताबिक दीपक जलाया। देखिए उसने उसके साथ कैसा व्यवहार किया।” येथे एक्स-पोस्टचे संग्रहण पाहता येईल.
आम्हाला हा दावा मराठी भाषेत व्हाट्सअपवर आढळला.
दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही व्हिडिओच्या मुख्य फ्रेमचा Google रिव्हर्स इमेज सर्च केला. या वेळी आम्हाला दिव्य मराठीने व्हायरल व्हिडिओ संदर्भात 2 वर्षांपूर्वी प्रकाशित केलेले एक वृत्त सापडले. रिपोर्टनुसार, 2022 मध्ये हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्याची दखल तत्कालीन दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनीही घेतली होती.
तपासादरम्यान आम्हाला स्वाती मालीवाल यांनी कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना लिहिलेले पत्रही आढळून आले, ज्यात त्यांनी व्हिडिओवर चिंता व्यक्त केली होती. 3 ऑक्टोबर 2022 रोजी हे पत्र त्यांनी आपल्या X खात्यावरून देखील शेअर केले होते.
आता आम्ही संबंधित कीवर्डच्या मदतीने या घटनेशी संबंधित माहिती शोधली. याचा परिणाम म्हणून आम्हाला इंडिया टुडेने 4 ऑक्टोबर 2022 रोजी प्रकाशित केलेला रिपोर्ट सापडला. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेचे नाव आयशा असल्याचे सांगण्यात आले आहे. या रिपोर्टमध्ये आयशाच्या व्हिडिओ स्टेटमेंटचाही समावेश आहे. 2022 मध्ये प्रकाशित झालेल्या या रिपोर्टमध्ये आयशाने सांगितले की ती तिचा पती मोहम्मद मुश्ताकपासून वेगळी राहत आहे. मुश्ताकने आपल्यावर 50 लाख रुपयांचा मानहानीचा खटलाही दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पुढील तपासात असे आढळून आले की, आयशा बानोचा पती मोहम्मद मुश्ताक याने कर्नाटक उच्च न्यायालयात मुलाच्या ताब्यासाठी याचिका दाखल केली होती, परंतु 21 डिसेंबर 2021 रोजीच्या आदेशात मोहम्मद मुश्ताकची याचिका फेटाळण्यात आली आणि त्यांना 50,000 रुपये आयशाला नुकसान भरपाई देण्याच्या सूचना मिळाल्या. न्यायालयाच्या या आदेशात पान तीनवर म्हटले आहे की, मोहम्मद मुश्ताक आणि आयेशा बानो हे दोघेही सुन्नी मुस्लिम आहेत. न्यायालयाच्या आदेशात धर्माच्या आधारावर घरगुती हिंसाचाराचा उल्लेख नाही.
तपासादरम्यान, आम्हाला आयेशा बानोने 1 नोव्हेंबर 2022 रोजी इंस्टाग्राम पेज ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ वर दिलेली मुलाखत सापडली. पोस्टसोबत दिलेल्या माहितीनुसार, आयशाने सांगितले की, व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी घटना 2015 साली घडली होती, जी आयशा बानोच्या मुलाच्या दुसऱ्या वाढदिवसादरम्यान घडली होती. त्यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा शाहरानच्या वाढदिवसादरम्यान, रात्री मुश्ताकने कॅमेरा सेट करून वापस येण्यापूर्वी आयशाने मेणबत्ती पेटवली होती, मुश्ताकला याचा राग आला आणि त्याने आयशाला कॅमेऱ्यासमोर मारहाण केली.
तपासातून आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचतो की घरगुती हिंसाचाराचा हा व्हायरल व्हिडिओ 2015 सालचा आहे, ज्यामध्ये कोणताही जातीय अँगल नाही. व्हिडिओमध्ये दिसणारे पती-पत्नी दोघेही एकाच धर्मातील आहेत.
Sources
Report published by Divya Marathi
Report published by India Today on 4th October 2022.
Karnataka High Court Orders.
Post by Humans of Bombay.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad Prabhu
February 12, 2025
Runjay Kumar
February 11, 2025
Ishwarachandra B G
February 8, 2025