दिग्दर्शक – अभिनेता प्रविण तरडेंना मारहाण झाल्याची बातमी व्हायरल झाली आहे. एबीपी माझाच्या बातमीची 19 सेकंदांची क्लिप व्हायरल झाली असून यात मुळशी पॅटर्नचे दिग्दर्शक अभिनेते प्रविण तरडे यांना कार्यालयात घुसून अज्ञात लोकांनी मारहाण केल्याचे म्हटले आहे.
प्रविण तरडे हे नुकतेच संविधानाच्या पुस्तकावर गणपतीची स्थापना केल्यामुळे वादात अडकले होते. सोशल मीडियात टिका झाल्यानंतर तरडे यांनी जाहीर माफी मागतली गणपतीच्या मूर्तीखालून संविधान देखील काढून घेतले. मात्र अशातच त्यांना मारहाण झाल्याची पोस्ट व्हायरल झाली. यात म्हटले पौड रस्त्यावरील तरडे यांच्या कार्यालयात घुसून त्यांना मारहाण करण्यात आली.
Fact Check / Verification
आम्ही याबाबत पडताळणी सुरु केली असता आम्हाला महाराष्ट्र टाईम्सची दोन वर्षांपूर्वीची 19 नोव्हेंबर 2018 रोजीची बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटावरून हे कार्यालय फोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, प्रवीण तरडे यांनी फेसबुकवर लाइव्ह करून हा प्रकार किरकोळ असून गैरसमजातून माझ्याच गावातील तरुणांनी हा प्रकार केला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल.

अधिक शोध घेतला असता आम्हाला एबीपी माझाच्या मूळ बातमीचा व्हिडिओ देखील आढळून आला. याच व्हिडिओमधील 19 सेंकदांचा भाग व्हायरल करण्यात आला असल्याचे सत्य पडताळणीत समोर आले.
सोशल मीडियात मारहाणीची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर प्रवीण तरडे यांनी स्वतः फेसबुक लाईव्ह करुन हे खोटे असल्याचे सांगितले आहे. तरडे म्हणाले की, मला मारहाण झालेली नाही. कोणी तरी जाणीवपूर्वक हे सर्व करीत आहे. कृपया कोणीही या अफवांवर विश्वास ठेवू नका.
Conclusion
यावरुन हेच सिद्ध होते की, अभिनेता- दिग्दर्शक प्रविण तरडे यांना मारहाण झालेली नाही, दोन वर्षांपुर्वीच्या बातमीची व्हिडिओ क्लिप आत्ताची म्हणून व्हायरल करण्यात आली आहे.
Result- Misleading
Sources
महाराष्ट्र टाईम्स- https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/pravin-tarade-blinks-hitting/articleshow/66682354.cms
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.