Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckViralदुचाकी घसरण्याचा व्हायरल व्हिडिओ खरंच पुण्यातील हडपसरचा आहे? याचे सत्य जाणून घ्या

दुचाकी घसरण्याचा व्हायरल व्हिडिओ खरंच पुण्यातील हडपसरचा आहे? याचे सत्य जाणून घ्या

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. त्यात असा दावा केलाय की, पुण्यातील हडपसरच्या पुलावर ऑइल सांडल्याने अपघात झालाय. त्या व्हिडिओत पाऊस पडतांना दिसत आहे आणि त्यामुळे पुलावर काही दुचाकी घसरताना दिसत आहे. 

Shelton Dharshis या फेसबुक युजरने हा व्हिडिओ शेअर करत त्यात लिहिले की,”पुणे हडपसर ब्रिजवर ऑइल सांडले होते. पण पावसामुळे कोणाला दिसले नसल्याने कसे अपघात झाले बघा. त्यामुळे पावसाळ्यात गाडी सावकाश चालवा..”

फोटो साभार : Facebook/Shelton Dharshis

फेसबुकवर अनेक युजरने या शीर्षकासह हा व्हिडिओ शेअर केला आहे.

फोटो साभार : Facebook/Yogesh Bhokare

सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील पाण्यामुळे अनेकदा रस्ते निसरडे होतात, त्यामुळे दुचाकी घसरतात. त्यातच आता सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत दावा केला जातोय की, पुण्यातील हडपसरच्या पुलावर ऑइल सांडल्याने अपघात झालाय. आम्हांला न्यूजचेकरच्या (+९१-९९९९४९९०४४) या व्हाट्स ॲप नंबरवर हा दावा तथ्य पडताळणी करण्यासाठी एका युजरने पाठवला आहे.

व्हाट्स ॲप नंबरवर पाठवलेला दावा

Fact Check / Verification

पुण्यातील हडपसरच्या पुलावर ऑइल सांडल्याने खरंच अपघात झाला, याची पडताळणी करण्यासाठी आम्ही तो व्हिडिओ पुन्हा पाहिला. त्या व्हिडिओमध्ये आम्हांला पाकिस्तानचा झेंडा दिसला. त्याचबरोबर आम्हांला होंडा ड्राईव्ह इनचे शोरूम दिसले. मग आम्ही ‘होंडा ड्राईव्ह इन पाकिस्तान’ असं गुगलवर टाकून शोधलं. तेव्हा आम्हांला हे शोरूम पाकिस्तानचे असल्याचे समजले.

फोटो साभार : Google Search Result

त्याचबरोबर आम्हांला यु ट्यूबवर त्या रस्त्यावरील व्हिडिओ मिळाला. त्या व्हिडिओत देखील होंडाचे शोरूम दिसत आहे. त्या व्हिडिओच्या शीर्षकात लिहिलंय,”#Karachi : R.J.Shopping Mall to Safari Park, Street view 360° VR Video #4K Ultra HD” 

फोटो साभार : YouTube/Karachi local guide

त्यानंतर आम्ही व्हायरल आणि यु ट्यूब व्हिडिओतील एका फ्रेमची तुलना केली. त्यावेळी आम्हांला खात्री पटली की, या दोन्ही फ्रेम एकच आहे. 

फोटो साभार : Facebook/News15 मराठी, YouTube/Karachi local guide

या व्यतिरिक्त आम्हांला २६ जून २०२२ रोजी प्रकाशित झालेली रिपब्लिक वर्ल्डची बातमी मिळाली. त्या बातमीनुसार, कराचीमध्ये जोरदार पाऊस झाल्याने राशीद मिन्हांस रोडजवळील मिलेनियम मॉल बाहेरील पुलावर रस्ता निसरडा झाल्याने काही दुचाकीस्वार घसरून पडले. 

फोटो साभार : Republic World

त्याचबरोबर आम्हांला २३ जून २०२२ रोजी प्रकाशित झालेली जिओ न्यूजची बातमी मिळाली. त्यात देखील हा व्हिडिओ कराचीतील असल्याचे सांगितले आहे.

फोटो साभार : Geo News 

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, व्हायरल व्हिडिओ पुण्यातील हडपसरचा नसून तो पाकिस्तानातील कराचीमधला आहे. 

Result : False

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular