Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Viral
सोशल मीडियात एका निराळ्या फुलाचा फोटो व्हायरल होत आहे, दावा करण्यात येत आहे की हा फोटो औदुंबराच्या फुलाचा फोटो आहे. हे फूल 50 वर्षांत एकदाच उमलते. औदुंबराचे फूल कधी कुणाला दिसत दर्शनाचा लाभ घ्यावा. हे फूल पुढे पाठवा यामुळे अनेक लोक दर्शन घेऊ शकतील, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. आम्हाला ही पोस्ट शेअरचॅट या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर आढळून आली.
आम्ही सोशल मीडियात व्हायरल होत असलेले फूल हे औदुंबराचेच आहे का याची पडताळणी करण्याचे ठरविले याच दरम्यान फेसबुकवर हा फोटो व्हायरल झाला असल्याचे आढळून आले.
आम्ही औदुंबराच्या फुलाविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या शोधादरम्यान उंबराच्या झाडाचे फूल दिसून येत नसल्याची माहिती विकिपीडियात आढळून आली. यानंतर आम्ही व्हायरल फोटो नेमका कशाचा आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता हा फोटो फूलाचा नसून वनस्पतीचा आहे असे दिसून आले. हे फोटो Cycad वर्गाच्या वनस्पतीच्या प्रजाती असल्याचे दिसून आले. या प्रजातीच्या 111 वनस्पती असून त्यातील 11 वनस्पती भारतात उपलब्ध आहेत. त्यानंतर आम्हाला Cycas Pectinata प्रजातीची फोटो दिसून आली.
अधिक माहिती घेतली असता ही वनस्पती भारताच्या उत्तर पूर्वेकडील काही भागात आढळून येते असे आढळून आले या वनस्पतीच्या वैशिष्ट्यांचा एक व्हिडिओ देखील आढळून आला.
या झाडाला फुले येत नसल्याचे या व्हिडिओतून स्पष्ट होते. या झाडाच्या दोन नव्या प्रजाती डॉ. रिटा सिंग, जे.एस. कुरयजाम, पी. राधा यांनी 2015 मध्ये ओडिशात Cycadaceae आणि सायकास नायगेरॅनिसिस नावाच्या प्रजाती शोधून काढल्या.
यावरुन हेच स्पष्ट होते की, औदुंबराच्या फुलाचा फोटो नसून एका वनस्पतीचा आहे. हा फोटो चुकीच्या दाव्याने व्हायरल होत आहे.
wikipedia- https://en.wikipedia.org/wiki/Cycad#/media/File:Cycas_circinalis.jpg