Viral
दीपिका पादुकोणने शेतक-यांच्या समर्थनार्थ टी-शर्ट घातला नाही, हे आहे सत्य

बाॅलिवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणने शेतक-यांच्या समर्थनार्थ टी- शर्ट घातल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत तिने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला असून त्यावर इंग्रजीत I_Stand_with_Indian_Farmers ( मी भारतीय शेतक-यांच्या बाजूने आहे) हे घोषवाक्य लिहिल्याचे दिसत आहे. दावा करण्यात येत आहे की, दीपिका जेएनयुमधील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ उतरल्यानंतर आता शेतक-यांना समर्थन देत आहे.
संग्रहित

Fact Check/Verification
आम्ही व्हायरल होत असलेल्या फोटोची पडताळणी करण्याचे ठरविले. अभिनेत्री दीपिका पादुकोणने एनसीबीच्या चौकशीला सामोरे जाताना खरंच शेतक-यांच्या समर्थनार्थ खरंच टी-शर्ट घातला होता का याचा शोध सुरु केला, मात्र गूगलमध्य दीपिकाने शेतक-यांचे समर्थनार्थ टीशर्ट घातल्याची बातमी आढळून आली नाही.
यानंतर आम्ही दीपिकाचा व्हायरल होत असलेला फोटो गूगल रिव्हर्स इमेजच्या माध्यमातून शोधला असता याचे अनेक रिजल्ट्स दिसून आले. याच दरम्यान आम्हाला मार्च 2018 मध्ये इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या एका लेखात हा फोटो आढळून आला. यात दीपिका विमानतळावरुन बाहेर पडताना कॅमे-यात कैद झाल्याचे म्हटले आहे. दीपिका शिवाय वेगवेगळ्या ठिकाणी कॅमे-यात कैद झालेल्या सेलिब्रिटींचे फोटो देखील यात शेअर करण्यात आले आहेत.

यानंतर आम्ही दोन्ही फोटोंची तुलना करुन पाहिली दीपिकाचा जुना फोटो माॅर्फ केल्याचे लक्षात आले.

Conclusion
यावरुन हेच सिद्ध झाले की, दीपिका पादुकोणचा दोन वर्षांपूर्वीचा फोटो एडिट करुन शेतक-यांच्या समर्थनार्थ टी-शर्ट घातल्याचा म्हणून व्हायरल करण्यात आला आहे.
Result- False
Sources
Indian Express- https://indianexpress.com/photos/entertainment-gallery/priyanka-chopra-arrives-in-india-chitrangda-singh-deepika-padukone-5103541/5/
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.