Authors
Claim
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर होत आहे. त्यात असा दावा केलाय की, प्रसिद्ध ‘कच्चा बदाम’च्या भुवन बादायकरला रेल्वेने नोकरी दिली.
त्या व्हायरल व्हिडिओत एक व्यक्ती रेल्वेत उभा असलेला दिसत आहे. तो व्यक्ती काही लोकांना हात दाखवत आहे.
फोटोत दिसणाऱ्या व्यक्तीचा चेहरा प्रसिद्ध ‘कच्चा बदाम’च्या भुवन बादायकरसारखा मिळताजुळता दिसत आहे. मग त्यानंतर लोकं दावा करू लागले की, भुवन बादायकरला रेल्वेत नोकरी मिळाली.
Fact
प्रसिद्ध ‘कच्चा बदाम’च्या भुवन बादायकरला रेल्वेने नोकरी मिळाली, या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही काही कीवर्ड टाकून गुगलवर शोधले.
त्या दरम्यान आम्हांला डेली ट्रॅव्हल हॅक १ या एका इन्स्टाग्राम पानांवर १८ सप्टेंबर २०२१ रोजी अपलोड केलेला एक व्हिडिओ मिळाला.
“जेव्हा माझा मुलगा तेजस रेल्वेच्या गार्ड होण्यास तयार झाला.” असं त्या व्हिडिओच्या मथळ्यात लिहिले होते.
डेली ट्रॅव्हल हॅक १ यांनी अपलोड केलेला व्हिडिओ आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हे दोन्ही सारखेच आहे.
या विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी न्यूजचेकरने डेली ट्रॅव्हल हॅक १ शी संपर्क केला. त्यांनी सांगितले,”हा व्हिडिओ ‘कच्चा बदाम’चा गायक भुवन प्रसिद्ध होण्याआधीचा आहे. तो व्हिडिओ ऑक्टोबर २०२१ मधील आहे.”
पुढे बोलतांना सांगितले,”व्हिडिओत दिसणारी व्यक्ती गेल्या पंचवीस वर्षांपासून व्यवस्थापक या पदावर काम करत आहे. ते पहिले गार्ड या पदावर काम करत होते आणि आता ते व्यवस्थापक आहे. हा व्यक्ती प्रसिद्ध ‘कच्चा बदाम’च्या भुवन बादायकर नाही.”
या व्यतिरिक्त भुवन बादायकरला रेल्वेत नोकरी लागली, या संबंधित कोणतीही बातमी आम्हांला मिळाली नाही.
आम्ही भुवन बादायकरशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याशी काही संपर्क होऊ शकला नाही. जर संपर्क झाला तर आम्ही लेख अपडेट करू.
हे देखील वाचू शकता : डॉक्टर विकास आमटे यांनी कॅन्सर संबंधित कुठलाही मेसेज लिहिलेला नाही, खोटा दावा व्हायरल
Result : Fabricated/ False
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.