मुस्लिम व्यक्तीने हिंदू मुलींना दत्तक घेऊन त्यांचा हिंदू पद्धतीने विवाह लावून दिला असल्याचा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
पोस्टमध्ये म्हटले आहे की, सोनू सूद यांच्याकडून प्रेरणा घेत अहमदनगर येथील बाबाभाई पठाण यांनी दोन अनाथ मुलींना दत्तक घेतले आणि त्यांचे हिंदू रितीरिवाजनुसार लग्न देखील लावून दिले. पठाण यांनी एकता आणि मानवतेचे उदाहरण सगळ्यांसमोर ठेवले आहे.

Fact Check / Verification
सोनू सूद कडून प्रेरणा घेत अहमदनगरमधील बाबाभाई पठाण यांनी हिंदू मुलींना दत्तक घेऊन त्यांचे लग्न लावून दिले आहे का याबाबत जाणून घेण्याचे आम्ही ठरविले. याच शोध दरम्यान आम्हाला हाच दावा करणा-या फेसबुक पोस्ट आढळून आल्या.


यासंदर्भात माध्यमांत मुख्य प्रवाहीतील माध्यमांत बातम्या देखील आढळून आल्या. महाराष्ट्र टाईम्सची देखील याबद्दल माहिती दिली होती मात्र बातमीत बाबाभाई पठाण हे मुलींचे मामा बनले होते व त्यांनी दोन्हींची पाठवणी केली असे म्हटले आहे.
मटाच्या बातमीनुसार बोधेगाव येथे जुनून ए इंसानियत सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष बाबाभाई पठाण यांच्या घरासमोर भुसारी कुटूंब राहते. पतीशी पटत नसल्याने त्यांची मुलगी सविता दोन मुली आणि एक मुलासह माहेरी निघून आली होती. धुणी भांडी करून सविताने मुलांना वाढविले, शिकविले. घरासमोरच राहणारा बाबाभाई यांना सविता भाऊ मानते. सविता यांना सख्खा भाऊ नाही. अनेक वर्षांपासून हे मानलेले नाते आहे. रक्षाबंधन, भाऊबीज हे सण सख्या नात्याप्रमाणे साजरे करतात. मुलांच्या शिक्षणासाठीही बाबाभाईंनी हातभार लावला. सविता यांची मुलगी गौरी बी.ए. झाली तर धाकटी सावरी हिची बारावी झाली. दोघींच्या लग्नाचे वय झाल्यावर स्थळासाठी शोधाशोध केली. तालुक्यातील मुंगी येथील स्थळ आले. तेथही दोन सख्ये भाऊ लग्नाळू होते. त्यामुळे बाबाभाई यांनीच पुढाकार घेत ते दोघे भाऊ आणि या दोघी बहीणी यांचे लग्न एकत्रच करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याला दोन्ही घरांतून मान्यता मिळाली.

याशिवाय दैनिक सकाळने देखील या मुस्लिम मामाने हिंदू मुलींची पाठवणी केल्याची बातमी दिली आहे.

Conclusion
यावरुन हेच स्पष्ट होते की, बाबाभाई पठाण यांनी हिंदू मुलींचा मामा म्हणून कर्तव्य पार पाडले आहे. या मुली अनाथ नसून त्यांचे आईवडील जिवंत असून वडिल त्यांच्याजवळ राहत नाहीत. सोशल मीडियात चुकीचा दावा व्हायरल झाला आहे.
Result- Misleading
Sources
Maharashtra Times- https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/muslim-man-fix-hindu-girl-marriage-in-ahmednagar/articleshow/77693086.cms
esakal- https://www.esakal.com/ahmednagar/appreciate-work-baba-pathan-336805
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.