Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckViralपुराच्या पाण्यात गाडी वाहून जाण्याचा व्हिडिओ खरंच नांदेडमधील आहे? चुकीचा दावा व्हायरल

पुराच्या पाण्यात गाडी वाहून जाण्याचा व्हिडिओ खरंच नांदेडमधील आहे? चुकीचा दावा व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केलाय की, हा व्हिडिओ नांदेडच्या हिमायतनगर जवळील घटना आहे. या व्हिडिओत एक जीप पाण्यात वाहून जाताना दिसत आहे.

उलगुलान टुडे न्यूज या यु ट्यूब वाहिनीने व्हायरल व्हिडिओ शेअर करत सांगितलंय की, हा व्हिडिओ हिमायतनगर जलधारा किनवटजवळील आहे.

फोटो साभार : YouTube/उलगुलान टुडे न्यूज
फोटो साभार : Facebook/page/Marathi Buzz

ट्विटरवर देखील हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. तिथे देखील हा व्हिडिओ नांदेडमधील हिमायतनगरचा असल्याचे सांगितले जात आहे.

फोटो साभार : Twitter@narwade67

या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता.

फोटो साभार : Twitter@GajananJogdan19

या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता.

महाराष्ट्रात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय. त्यामुळे गोदावरी, पैनगंगा, मांजरा, मन्याड, सीता नदी दुथडी भरून वाहत आहे. या पावसामुळे किनवट, हिमायतनगर, हदगाव, तामसा, मालेगांव, अर्धापुर, भोकर राष्ट्रीय महामार्गावरील अनेक छोट्या-मोठ्या पुलावरून पाणी गेले, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. त्यातच आता हा व्हिडिओ शेअर करत दावा केला जातोय की, हा व्हिडिओ नांदेडमधील हिमायतनगर जवळील आहे.

Fact Check / Verification

व्हायरल व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी आम्ही तो व्हिडिओ पुन्हा पाहिला. त्या गाडीची पिवळी नंबर प्लेट आणि त्याच्यावर सुझुकीचा कुठलातरी लोगो दिसत होता. पण ते स्पष्ट दिसत नव्हते. मग आम्ही इन-व्हीड टूलच्या मदतीने ते झूम करून पाहिले. तेव्हा आम्हांला दिसले की, सुझुकीच्या लोगोखाली POTOHAR 4WD असं लिहिलं होतं.

फोटो साभार : Facebook/page/महापंचनामा न्यूज, static.carmandee.com

त्यानंतर आम्ही ‘suzuki potohar jeep’ असं गुगलवर टाकून शोधले. त्यावेळी आम्हांला पाकिस्तानचे काही संकेतस्थळ दिसले.

फोटो साभार : Google Search Result

आम्ही सुझुकी पोतोहार या गाडीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगलवर शोधले. त्यावेळी आम्हांला समजले की, पाकिस्तान सुझुकी मोटर्सने ‘सुझुकी पोतोहार’ या नावाने त्या गाडीची निर्मिती केली. त्याचबरोबर आम्ही गुगलवर ‘सुझुकी पोतोहार’ असं टाकून शोधले. तेव्हा लेखक Louis F. Fourie यांच्या On A Global Mission: The Automobiles of General Motors Volume 3: GM Worldwide Review, North American Specifications and Executive Listings या पुस्तकात आम्हांला १२३७ व्या पानावर ‘सुझुकी पोतोहार पाकिस्तान’ असं लिहिलेले आढळले. यावरून हे स्पष्ट झाले की, सुझुकी पोतोहार ही जीप पाकिस्तानची आहे.

फोटो साभार : Louis F. Fourie (Author)

त्यानंतर आम्ही यु ट्यूबवर ‘सुझुकी पोतोहार पाकिस्तान’ असं टाकून शोधले. त्यावेळी आम्हांला [Tareen Productions] Creator या यु ट्यूब वाहिनीने २५ मार्च २०२० रोजी अपलोड केलेला एक व्हिडिओ मिळाला. “Flood in District Harnai, Balochistan, Pakistan.|23-03-2020|” असे त्या व्हिडिओच्या शिर्षकात लिहिले आहे. हा व्हिडिओ आणि व्हायरल झालेला व्हिडिओ दोन्ही सारखेच होते. या अपलोड केलेल्या व्हिडिओचे लोकेशनदेखील पाकिस्तान आहे. हा व्हिडिओ २०२० पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे.

फोटो साभार : YouTube/[Tareen Productions] Creator

हे देखील वाचू शकता : राष्ट्रपती पदासाठी काँग्रेसच्या उमेदवारालाच पाठिंबा द्यायचा, असं विधान खरंच संजय राऊत यांनी केलंय? भ्रामक दावा व्हायरल

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, व्हायरल होणारा व्हिडिओ नांदेडमधील नसून पाकिस्तानचा आहे. हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे.

Result : False

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular