Tuesday, May 17, 2022
Tuesday, May 17, 2022

घरFact CheckViralसोनी टीव्हीवर प्रसारित होणारा 'द कपिल शर्मा शो' बंद होणार नाही, चुकीचा...

सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा ‘द कपिल शर्मा शो’ बंद होणार नाही, चुकीचा दावा होतोय व्हायरल

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर होत आहे. त्यात दावा केलाय की, कपिल शर्मा यांचा कार्यक्रम बंद होणार आहे. फेसबुकवर एका युजरने व्हायरल पोस्ट शेअर करत लिहिले,”मोठी बातमी ! मौलवीची अवलाद कपिल शर्मा शो बंद झाला! ज्यांना आनंद झाला, त्यांचे पोस्टवर स्वागत आहे.”

(मूळ फेसबुक पोस्टचा मराठीत अनुवाद केला आहे)

फेसबुक पोस्टचा स्क्रिनशॉट – Shivam Rana

(ट्विटची संग्रहित लिंक तुम्ही इथे पाहू शकता)

काही दिवसांपासून कपिल शर्मा शो चर्चेत आला. जेव्हा ११ मार्च ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करून लिहिले की, कपिल शर्मा यांच्या टीमने ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाची जाहिरात करण्यास नकार दिला. विवेकने कपिल शर्मा यांच्यावर आरोप केला. कपिल शर्मा म्हणाले की या चित्रपटात कोणी मोठा कलाकार नाही. त्यामुळे आम्ही त्याची जाहिरात करणार नाही. त्यानंतर ट्विटरवर कपिल शर्मा यांना बऱ्याच युजरने ट्रोल केले. या घटनेच्या काही दिवसानंतर एका मुलाखतीत ‘द काश्मीर फाईल्स’चे कलाकार आणि बॉलीवूड अभिनेता अनुपम खेर यांनी सांगितले की, कपिल शर्मा शो आमच्या चित्रपटाची जाहिरात करू इच्छित नाही. कारण हा चित्रपट एका गंभीर विषयावर बनवला आहे आणि कपिल यांचा शो एक विनोदी कार्यक्रम आहे.

त्यानंतर काही दिवसानंतर कपिल शर्मा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर पोस्ट करून लिहिले,”२०२२ मध्ये युएस-कॅनडा टूरची घोषणा करतांना खूप आनंद होत आहे. लवकरच तुमच्याशी भेटेन.” यातच आता सोशल मीडियावर कपिल शर्मा यांचा कार्यक्रम बंद होणार आहे. 

Fact Check / Verification 

या घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही गुगलवर शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी २६ मार्च २०२२ रोजी प्रकाशित झालेली इंडियन एक्सप्रेसची एक बातमी मिळाली. त्या बातमीनुसार ‘सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा  ‘द कपिल शर्मा शो’ तात्पुरता बंद होत आहे. शोचे होस्ट कपिल शर्मा युएस-कॅनडा टूरमुळे एपिसोड दिग्दर्शित करण्यास नकार दिला. त्यानंतर निर्मात्यांनी हा शो तात्पुरता बंद करण्याचा विचार केला.” मागच्या वर्षी जानेवारीत कपिल शर्मा यांनी छोटा ब्रेक घेतला होता, जेव्हा ते दुसऱ्यांदा वडील झाले होते.

त्यानंतर आम्ही सोनी टीव्हीचे इन्स्टाग्रामचे पान शोधण्यास सुरवात केली. त्यावेळी आम्हांला ३१ मार्च २०२२ रोजी सोनी टीव्हीच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट मिळाली. पोस्टनुसार ‘व्हिलन आम्हांला हसवायला येत आहे, हे ठाऊक होते. पण त्यात स्वप्नांचा मुकेश मिळणार, हे आता कळतंय. पाहा कपिल शर्मा शो ह्या शनिवार-रविवारी रात्री साडे नऊ वाजता सोनी टीव्हीवर.’

Instagram will load in the frontend.

याच दरम्यान न्यूजचेकरने कपिल शर्मा यांचे मॅनेजर अजय यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले,”कपिल शर्मा शो बंद होणार नाही. या शो संबंधित सोशल मीडियावरील सर्व दावे चुकीचे आहे.” या व्यतिरिक्त आम्ही सोनी टीव्हीचे मॅनेजर कृपा नायक यांच्याशी देखील संपर्क साधला. त्यांनी सांगितले,”या आठवड्यात आम्ही मूळ शो ची शूटिंग करणार आहे.”

Conclusion 

अशा पद्धतीने आमच्या तपासात हे स्पष्ट झाले की, कपिल शर्मा शो बंद होणार नाही. सोशल मीडियावरील तो दावा चुकीचा आहे.

Result: Fabricated News/False Content

Our Sources

इंडियन एक्सप्रेसची २६ मार्च २०२२ रोजीची प्रकाशित झालेली बातमी 

सोनी टीव्हीची ३१ मार्च २०२२ ची इन्स्टाग्राम पोस्ट

कपिल शर्मा यांच्या मॅनेजरशी साधलेला संवाद

सोनी टीव्हीचे वरिष्ठ व्यवस्थापक यांच्याशी साधलेला संवाद

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular