Thursday, December 19, 2024
Thursday, December 19, 2024

HomeFact CheckViralपाकिस्तानच्या संसदेत मोदी-मोदी घोषणा देण्यात आल्या नाहीत, खोटा दावा व्हायरल

पाकिस्तानच्या संसदेत मोदी-मोदी घोषणा देण्यात आल्या नाहीत, खोटा दावा व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

पाकिस्तानच्या संसदेत मोदी-मोदी घोषणा देण्यात आल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी हे संसदेत बोलायला उभे राहिले असताना काही संसद सदस्य मोदी-मोदीच्या घोषणा देत आहेत आहेत हे व्हायरल व्हिडिओत दिसून येते.

https://fb.watch/1syZUXnPRz/

संग्रहित

https://www.facebook.com/groups/2532396926974517/permalink/2767483310132543

Fact Check/Verification

खरंच पाकिस्तानच्या संसदेत मोदी-मोदीच्या घोषणा देण्यात आल्या का, याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. काही किवर्डसच्या मदतीने शोध घेतला असता दुनिया न्यूज या पाकिस्तानी टिव्ही चॅनलचा 26 आॅक्टोबर 2020 रोजीचा एक व्हिडिओ युट्यूबवर आढळून आला. यात पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी हे संसदेत भाषण करताना दिसत आहेत.

पाकिस्तानमधील प्रसिध्द डाॅन या वर्तमानपत्राच्या वेबसाईटवर यासंदर्भातील बातमी आढळून आली. या बातमीनुसार पाकिस्तानी संसदेत फ्रान्समधील घटनांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी इस्लामफोबिया पसरविणाऱ्या देशांविरोधाच्या ठरावावर मतदानाची मागणी विरोधक व्होटिंग, व्होटिंग असे इंग्रजीत म्हणत होते. हा ठराव नंतर एकमताने संमत करण्यात आला.  

Conclusion

यावरुन हेच सिद्ध होते की, पाकिस्तान संसदेत व्होटिंग व्होटिंग अशा घोषणा देण्यात आल्या. पाकिस्तानी संसदेत मोदी-मोदी अशा घोषणा देण्यात आल्याचा दावा चुकीचा आहे.

Result: Misleading

Our Source

Dunya Newshttps://www.youtube.com/watch?v=zBu_wR2TzFk

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular