Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मार्क झुकरबर्गचा भगव्या कपड्यातील फोटो व्हायरल झाला आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, शेतक-यांचा आंदोनलाविरोधातल्या गुन्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गची देखील साथ आहे. दिल्लीच्या सिंधू सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलना दरम्यान #FacebookJioAgainstFarmers हा ट्रेंड सुरु झाला असून, याच दरम्यान मार्क झुकरबर्गचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा भगवा कपड्यातील फोटो देखील व्हायरल झाला आहे.
Fact Checking/Verification
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मार्क झुकेरबर्ग मंचावर एकत्र कधी उपस्थित होते याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. अधिक शोध घेतला अशता मार्क झुकेरबर्ग आॅक्टोबर 2015 मध्ये भारतात आला होता त्यावेळी त्याने आपल्या भारत दर्शनाची सुरुवात ताजमहालपासून केली होती. मात्र या दरम्यान तो भगवी वस्त्रे परिधान करुन पंतप्रधान नरेंद्र यांच्यासोबत मंचावर उपस्थित झाल्याची एकही बातमी आढळून आली नाही.
यानंतर आम्ही व्हायरल फोटोचा गूगल रिव्हर्स इमेजच्या मदतीने शोध घेतला असता हा फोटो माॅर्फ केल्याचे आढळून आले. कारण महाराष्ट्र टाईम्स मध्ये 10 आॅगस्ट 2020 रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखातील फोटोत मार्क झुकरबर्गच्या जागी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असल्याचे आढळून आले.
याशिवाय इकाॅनाॅमिक टाईम्सच्या वेवसाईटवर 1 आॅगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखात देखील योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आढळून यात यात देखील मोदींची तीच पोज आहे.
यानंतर आम्ही दोन्ही फोटोंची तुलना करुन पाहिली असता मार्क झुकेरबर्गचा फोटो माॅर्फ केल्याचे आढळून आले.
Conclusion
यावरुन हेच स्पष्ट होते की, मार्क झुकरबर्गचा फोटो माॅर्फ करण्यात आलेला आहे. त्याचा शेतकरी आंदोलनाशी संबंध नाही.
Result: False
Our Sources
Economic Times- https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/pm-bhagwat-up-cm-a-select-few-to-share-stage/articleshow/77291031.cms
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.