Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckViralअटलबिहारी वाजपेयींचा आईसोबत लहानपणीचा नाही व्हायरल फोटो, हे आहे सत्य

अटलबिहारी वाजपेयींचा आईसोबत लहानपणीचा नाही व्हायरल फोटो, हे आहे सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचा लहानपणीचा आईसोबत काढलेला एक फोटो असल्याचा दावा व्हायरल होत आहे. ब्लॅक अॅन्ड व्हाईट या फोटोत एक महिला आणि लहान मुलाचा फोटो आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, आईच्या कुशीत अटलजी, जयंतीनिमित्त शतश: नमन

संग्रहित/ फेसबुक

अधिक शोध घेतला असता आम्हाला हा फोटो 2018 मध्ये देखील याच दाव्याने ट्विट केल्याचे आढळून आले.

संग्रहित

व्हायरल फोटो आम्ही गुगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोधला असता आम्हाला रानू शंकर नावाच्या फेसबुक प्रोफाईलवर हा फोटो शेअर केल्याचे आढळून आले. यात म्हटले आहे की, रानू नीलम शंकर अपने #मां स्वर्गीय #नीलम शंकर के गोद में!!(1977_78)

https://www.facebook.com/photo/?fbid=2897279320392694

संग्रहित

या फेसबुक प्रोफाईलवर हा फोटो अनेक वेळा शेअर केल्याचे आम्हाला आढळून आले.

https://www.facebook.com/photo?fbid=1648875041899801&set=a.476374942483156

संग्रहित

रानू शंकर हे कोण आहेत हे आम्ही तपासले असता ते मुज्जफरनगर येथील असून समाजसेवक असल्याचे त्यांच्या फेसबुक प्रोफाईवर आढळून आले. याशिवाय आम्हाला न्यूज मोबाईल या वेबसाईटचे एक आर्टिकल आढळून आले. ज्यात रानू शंकर यांच्या प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे. ते मुज्जफरनगरमधील गांधी स्वराज आश्रमाचे चेअरमन आहेत. यांनी यात सांगितले आहे की हा फोटो त्यांच्या आणि त्यांच्या आईचा आहे. त्यांनी हे देखील सांगितले की हा फोटो दोन वर्षांपूर्वी फेसबुकवर अपलोड केला होता. त्यानंतर अनेक वेळा स्पष्टिकरण दिल्यानंतर देखील फेक दाव्याने ब-यादा व्हायरल झाला.

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, व्हायरल फोटो माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या बालपणीचा नसून तो मुज्जफरनगर मधील राणू शंकर यांचा लहानपणीचा आहे.

Result: Misleading

Our Sources

Facebook- https://www.facebook.com/ranu.shankar

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular