दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनादरम्यान शेतक-यांचे हजारो तंबू सिंधू बाॅर्डरवर उभे राहिले असलेल्याच्या दाव्याने एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात म्हटले आहे हा फोटो दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान टाकण्यात आलेला तंबुंचा आहे. जो शेतकरी धान्य उगवणे जाणतो त्याला घर बनविणे देखील माहिती आहे. आम्हाला हा फोटो आमच्या एका वाचकाने पडताळणीसाठी पाठवला आहे.

या फोटोबाबत अधिक शोध घेतला असता आम्हाला हा फोटो याच दाव्याने फेसबुक आणि ट्विटरवर देखील व्हायरल होत असल्याचे आढळून आले.


Fact Checking/Verification
दिल्लीच्या सिंधु बाॅर्डरवर मागील 42 दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा हा फोटो आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. गुगल रिव्हर्सच्या साहाय्याने आम्ही याचा शोध सुरु केला असता kerranelamassa नावाच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या एका लेखात हा फोटो आढळून आला. यात म्हटले आहे की हा फोटो भारतातील सर्वात मोठ्या कुंभमेळ्यादरम्यानचा आहे.

आम्ही काही किवर्डच्या मदतीने शोध घेतला असता agefotostock या वेबसाईटवर आम्हाला कुंभमेळ्यातील अनेक फोटो पाहायला मिळाले त्या सध्या व्हायरल होत असलेला फोटो देखील आढळून आला.

याशिवाय आम्हाला फेसबुकवर kerranelamassa चे अधिकृत पेज आढळून आले, ज्यात कुंभमेळ्याचे अनेक फोटो आढळून आले. यात व्हायरल फोटो देखील आहे.
यानंतर आम्ही हा फोटो ज्यांना काढला आहे त्या Ville Palonen फोटोग्राफरशी संपर्क साधला असता, त्यांनी आम्हाला सांगितले की, हा फोटो त्यांनी 2013 च्या अलाहाबाद कुंभमेळ्या दरम्यान काढला आहे.

Conclusion
यावरुन हेच स्पष्ट होते की व्हायरल फोटो दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यानच्या नसून 2013 सालच्या अलाहाबाद कुंभमेळ्यादरम्यानचा आहे.
Result: False
Our Sources
KERRANELAMASSA https://kerranelamassa.fi/maha-kumbh-mela-indias-largest-festival/
Agefotostock https://www.agefotostock.com/age/en/Stock-Images/Rights-Managed/PNM-pirm-20130209-sa0146
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.