Authors
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. त्यात असा दावा केलाय की, ही व्यक्ती गटारीच्या पाण्याने भाज्या धुवून हिंदू वस्तीत विकायला जाणार आहे. व्हिडिओ पाहिल्यावर समजते की, एक व्यक्ती गटारीच्या पाण्याने भाज्या धुत आहे.
एका फेसबुक युजरने ही व्हिडिओ शेअर करत लिहिलंय की, हा व्यक्ती गटारीच्या पाण्याने भाज्या धुवून हिंदू वस्तीत विकायला जाणार आहे. युजरने त्यात धर्मावर लक्ष वेधले आहे.
हा व्हायरल व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत एका युजरने लिहिलंय की, ही व्यक्ती गटारीच्या पाण्याने भाज्या धुवून हिंदू लोकांना विकायला जाणार आहे.
या युजरने पोस्टच्या माध्यमातून एका धर्मावर बहिष्कार टाकण्याबाबत भाष्य केले आहे.
जिहादच्या नावाखाली थुंकणे, अशा पद्धतीचा मजकूर सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. याआधीही शाहरुख खानच्या संबंधित एक दावा व्हायरल झाला होता. ज्यात असे म्हटले होते की, लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जेव्हा शाहरुख खान गेला. त्यावेळी तो त्यांच्या अंगावर थुंकला. आमच्या तपासात हा दावा भ्रामक ठरला.
याच पद्धतीने आता एक मुस्लिम व्यक्ती गटारीच्या पाण्याने भाज्या धुवून हिंदू वस्तीत विकायला जाणार आहे. अशा पद्धतीचे अनेक दावे आमच्या पडताळणीमध्ये फेक ठरले. ते तुम्ही इथे वाचू शकता.
Fact Check / Verification
एक व्यक्ती गटारीच्या पाण्याने भाज्या धुवून हिंदू वस्तीत विकायला जाणार आहे, या व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही इन-वीड टूलची मदतीने काही फ्रेम टाकून रिव्हर्स सर्च केले.
या प्रक्रियेत आम्हांला २ मार्च २०२० रोजी फ्री प्रेस जर्नलने प्रकाशित केलेली बातमी आढळली. त्या बातमीनुसार ही घटना २०२० मधील आहे.
या दरम्यान एका मुस्लिम व्यक्तीला भिवंडीच्या पोलिसांनी गटारीच्या पाण्याने भाज्या धुताना पकडले होते. त्याच्यावर आयपीसीच्या २७३ अंतर्गत केस दाखल केली.
त्यावेळी फ्री प्रेस जर्नलने एका पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क केला होता. या घटनेशी सुसंगत असलेल्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता, असं त्यांनी सांगितले.
ही पडताळणी करत असतांना आम्हांला असे समजले की, ट्विटरवर वरुण सिंह नावाच्या युजरने ही व्हिडिओ २९ फेब्रुवारी २०२० रोजी शेअर केली होती.
वरुणने त्यात लिहिले होते की,”मी ही व्हिडिओ काल टीव्हीवर पाहिली. आपणच स्वतःच कष्ट करून भाज्या पिकवणे, हाच एकमेव उपाय आहे. ही वास्तविकता खूपच वाईट आहे.”
अशा पद्धतीने हे स्पष्ट झाले की, सदर व्हिडिओ २०२० चा असून तो वेगवेगळ्या मजकुराने शेअर केला जात आहे.
या व्यतिरिक्त आम्हांला टाइम्स ऑफ इंडियाने १७ मार्च २०२० रोजी प्रकाशित झालेल्या एका लेखात व्हायरल व्हिडिओतील एक दृश्य दिसत आहे. त्यात असे लिहिले होते की, कॉमेडियन अली असगरने देखील हा व्हिडिओ विनोदी पद्धतीने शेअर केला होता.
कीवर्डच्या मदतीने शोधल्यावर आम्हांला १५ मार्च २०२० रोजी प्रकाशित झालेला दैनिक भास्करचा एक लेख मिळाला. ज्यात व्हायरल व्हिडिओ उपलब्ध आहे.
या लेखात अली असगरची इन्स्टाग्राम पोस्ट उपलब्ध आहे, ज्यात त्यांनी व्हायरल व्हिडिओ शेअर केला होता.
Conclusion
अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, गटारीच्या पाण्याने भाज्या धुवून हिंदू वस्तीत विकायला जाण्याचा केलेल्या दाव्याचा हा व्हिडिओ २०२० चा आहे.
या व्हिडिओत दाखवल्या जाणारा तो व्यक्ती एका धर्माच्या वस्तीत भाज्या विकायला गेलाय. या गोष्टीची पुष्टी आम्ही स्वतंत्रपणे करू शकलेलो नाही. पण हा व्हिडिओ चुकीच्या संदर्भात शेअर केला जात होता.
Result : False Context / Missing Context
Our Sources
फ्री प्रेस जर्नल, दैनिक भास्कर, टाइम्स ऑफ इंडिया यांनी दिलेल्या बातम्या
अली असगर यांची इन्स्टाग्राम पोस्ट
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.