Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
हिंदू युवकाने मुस्लिम युवतीशी लग्न केल्याचा दावा व्हायरल झाला आहे. समाजमाध्यमांत एका युवकाचा आणि युवतीचा फोटो व्हायरल होत आहे. यात युवकाच्या कपाळावर टिळा लावलेला दिसत आहे. तर त्याच्यासोबत असलेल्या युवतीने हिजाब घातला आहे. दोघेही एकमेकांच्या गळ्यात पडलेले दिसत आहेत. युवक हिंदू असून युवती मुस्लिम असल्याचा दावा केला जात आहे.
Fact Check/Verification
व्हायरल फोटो नेमका कुठला आहे आणि या जोडप्याचे नाव काय आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. रिव्हर्स इमेज सर्च मध्ये आम्हाला हाच फोटो असलेले 6 आक्टोबर 2020 रोजीचे एक ट्विट आढळून आले ट्विटमध्ये याशिवाय आणखी फोटो आहेत.
अधिक शोध घेतला असता आम्हाला kkubra.bbatuhan नावाचे प्रसिद्ध इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केलेली लिंक मिळाली. या अकाउंटवर असे अनेक फोटो आहेत, ज्यात हे जोडपे दिसत आहे.
या अकाउंटवरील पोस्ट गूगल ट्रांसलेटच्या साहाय्याने अनुवादित केल्या असता त्या तुर्कीश भाषेत असल्याचे आढळून आले. याशिवाय आम्हाला या इंस्टाग्राम अकाउंटच्या बायोमध्ये जोडप्याच्या युट्यूब चॅनलची लिंक देखील मिळाली शिवाय अकाउंटवर ते तुर्कीमध्ये राहत असल्याचा उल्लेख केला आहे.
Conclusion
यावरुन हेच सिद्ध होते की, व्हायरल पोस्टमधील हिंदू युवकाने मुस्लिम युवतीशी लग्न केल्याच्या दावा खोटा आहे तुर्कीश जोडप्याचा फोटो चुकीच्या दाव्याने व्हायरल झाला आहे.
Result- Misleading
Our Sources
इंस्टाग्राम- https://www.instagram.com/p/B92B2FIlXzr/
युट्यूब- https://www.youtube.com/channel/UCdxiPperVhLtJ5_1riybyMQ/about
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.