Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckViralरिझर्व बॅंकेने दोन हजाराच्या नोटांचा पुरवठा बंद केलेला नाही, व्हायरल झाला चुकीचा...

रिझर्व बॅंकेने दोन हजाराच्या नोटांचा पुरवठा बंद केलेला नाही, व्हायरल झाला चुकीचा दावा

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

रिझर्व बॅंकेने दोन हजाराच्या नोटांचा पुरवठा बंद केल्याने एटीएममध्ये या नोटा मिळत नसल्याचा दावा काही न्यूज आर्टिकल्समध्ये करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, देशातील एटीएममधून आता 2000 रुपयांच्या नोटा मिळणार नाहीत कारण आरबीआयने छपाई बंद केली आहे. बँका देखील एटीएम मशीनमधून या दोन हजाराच्या नोटेचे कॅलिबर पैसे काढत आहेत.

संग्रहित

संग्रहित

Fact Check/Verification

रिझर्व बॅंकेने खरंच दोन हजार रुपयांचा पुरवठा बंद केला आहे का आणि एटीएममधून आता फक्त 100, 200 आणि 500 रुपयांच्याच नोटा मिळणार आहेत का आणि दोन हजाराची नोट बंद होणार आहे का याची पडताळणी आम्ही सुरु केली. या शोधा दरम्यान आम्हाला दैनिक सामनाची डिसेंबर 2019 मधील बातमी आढळून आली. यात दोन हजाराची चलनातून कमी झाल्याने नागरिकांमध्ये नोट बंद होण्याचा संभ्रम निर्माण झाला असल्याने संसदेत विचारलेल्या गेलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, दोन हजाराची नोट बंद होणार नाही.

याशिवाय आम्हाला महाराष्ट्र टाईम्स ची बातमी आॅगस्ट 2020 मध्ये प्रसिद्ध झालेली बातमी आढळून आली ज्यात म्हटले आहे की, नव्या आर्थिक वर्षात दोन हजारांंच्या नोटांची छपाई कऱण्यात आलेली नाही. यात ही नोट बंद होण्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. मात्र अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

अधिक शोध घेतला असता आम्हाला पीआयबीचे 2 डिसेंबर 2020 रोजीचे ट्विट आढळले यात आरबीआयने दोन हजार रुपयांच्या नोटांचा पुरवठा कमी केला नसल्याचा व एटीएममधून ह्या नोटा हद्दपार होणार असल्याचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.

Conclusion

यावरुन स्पष्ट होते की, आयबीआयने दोन हजाराच्या नोटांचा पुरवठा बंद केलेला नाही, तसेच एटीएममधून देखील या नोटा हद्दपार होणार नाहीत. सोशल मीडियामध्ये चुकीचा दावा व्हायरल झाला आहे.

Our Sources

पीआयबी- https://twitter.com/PIBFactCheck/status/1334143216774307841

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular