Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckViralमोबाईल चार्जिंगला लावून बोलल्याने मुलाचा मृत्यू झाला नाही, हे आहे सत्य

मोबाईल चार्जिंगला लावून बोलल्याने मुलाचा मृत्यू झाला नाही, हे आहे सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

मोबाईल चार्जिंगला लावून बोलल्याने मुलाचा मृत्यू झाला असल्याच्या दाव्याने धडापासून डोेके वेगेळे झालेल्या रंक्तबंबाळ मुलाचा फोटो व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये मोबाईल चार्जिंगला लावून बोलू नका तसेच तुमच्याकडे जेवढे काॅन्टॅक्ट्स आणि ग्रुप असतील त्या सर्वांना ही बातमी पाठवा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Fact Check / Verification

व्हायरल फोटोतील मुलाचे डोके धडापासून वेगळे झाले असले तरी चार्जिंगच्या स्फोटामुळे त्याच्या गळ्याजवळ जळाल्याची खुण दिसत नाही. मुलाचा गळा कापल्यासारखा दिसत आहे. आम्ही या फोटोचे सत्य काय याची पडताळणी करण्याचे ठरविले. रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने हा फोटो शोधला असता आम्हाला 14 जून 2018 रोजीची एक उर्दूतील पोस्टमध्ये हा फोटो आढळून आला.

आम्ही पोस्टमधील मजकुराचा अनुवाद केले. पोस्टमध्ये म्हटले आहे की, वारी दिर बाला कडून मिळालेल्या वृत्तानुसार, सात वर्षांच्या अनाथ मुलाची काकांनी हत्या. हा शाह जमीलचा दिवंगत मुलगा आहे. हा रमजानचा महिना आहे आणि हा आपल्या सर्वांचा पाकिस्तान आहे. कारण ते काश्मीर, पॅलेस्टाईन आणि बर्मा यांचे चित्र नाही, म्हणून कदाचित याकडे जास्त लक्ष वेधले जाऊ नये परंतु मी फक्त असा विचार करीत वेडा झालो आहे की उद्या ईद असेल आणि त्याच्या आईनेही त्याच्यासाठी कपडे घेतले असतील, पण ते आता कफन म्हणून घालावे लागतील.

https://www.facebook.com/khalldirlower/posts/1699138700155341/

संग्रहित

अधिक शोध घेतला असता 14 जून 2018 रोजी  डॉक्युमेटिंग रिएलिटी वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली बातमी आढळली. बातमीनुसार पाकिस्तानच्या खायबर पख्तुनखाँ रमजानच्या महिन्यात इकबाल नावाच्या इसमाने त्याच्या सात वर्षीय पुतण्या सदिसची गळा कापून हत्या केली. बातमीत मुलाच्या निर्घुर्ण हत्येचे आणखी फोटो शेअर करण्यात आले आहेत.

मोबाईल चार्जिंगला लावून बोलल्याने खरंच स्फोट होऊ शकतो का याबद्दल आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता androidauthority.com या वेबसाईटवर याबदद्ल माहिती आढळून आली. यात म्हटले आहे की व्हायरल दावा चुकीचा आहे.

Conclusion

यावरुन हेच सिद्ध होते की मोबाईल चार्जिंगला लावल्याने मुलाचा मृत्यू झालेला नाही तर काकाने आपल्या पुतण्याची गळा चिरुन हत्या केली आहे. ही घटना पाकिस्तानमधील आहे. तसेच चार्जिंगला मोबाईल लावून बोलल्याने धोका नसतो असेही तज्ज्ञांचे मत असल्याचे आढळून आले.

Result- False

Our Sources

documentingreality- https://www.documentingreality.com/forum/f10/uncle-kills-nephew-warning-187153/

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

1 COMMENT

Most Popular